IMPIMP

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात तिसर्‍या लाटेचा धोका ! घाबरु नका, पण काळजी घ्या; राजेश टोपे म्हणाले…

by nagesh
Coronavirus in Maharashtra | Extremely worrying! More than 26,500 new corona patients in the state in the last 24 hours, learn other statistics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Coronavirus in Maharashtra | मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या विषाणुने देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेनं लोकांना हतबल करुन सोडलं आहे. तर या दोन्ही लाटा नियंत्रणात आल्यानंतर सर्व व्यवहार व्यवस्थितरीत्या सुरु झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत (Coronavirus in Maharashtra) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

राजेश टोपे म्हणाले, ‘देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर ओसरली. त्यानंतर कोरोना रुग्णाची संख्या कमी होऊ लागली.
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानं अनेक जण बेफिकीरीनं वागू लागले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.
डिसेंबरमध्ये राज्यात कोरोनाची तिसरी लाट (corona 3rd wave) येण्याचा धोका आहे.
पण, या लाटेची तीव्रता कमी असू शकते. लोकांनी घाबरू नये. मात्र काळजी घ्यावी, असं आवाहन टोपेंनी (Rajesh Tope) केलं आहे.

 

पुढे राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ‘कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर 2020 मध्ये, तर दुसरी लाट एप्रिल 2021 मध्ये आली होती.
तसेच, राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus in Maharashtra) डिसेंबरमध्ये येऊ शकते. मात्र, तिची तीव्रता जास्त नसेल.
राज्यातील लसीकरणाचा वेग चांगला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता फारशी नसेल. दरम्यान, राज्यात लसींची कमतरता नाही.
आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध आहेत. सध्या 1.77 कोटी डोस शिल्लक असून त्यात कोविशील्डच्या 1.13 कोटी डोसचा आणि कोवॅक्सिनच्या 64 लाख डोसचा समावेश आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, ‘राज्यातील 80 टक्क्यांहून जास्त जणांना लस देण्यात आलीय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात लसीकरणानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आधीच्या तुलनेत संक्रमणाचा वेग कमी आहे. मृत्यूदर जवळपास शून्याच्या जवळ आहे. परंतु, डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

 

Web Title : Coronavirus in maharashtra | third wave corona hit maharashtra december health minister rajesh tope issues stern warning read in marathi

 

हे देखील वाचा :

WBBL | टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 106 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या – ‘सरकार आणि पोलीस मुर्दाड असले तरी आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास’ (व्हिडिओ)

Related Posts