IMPIMP

Pune Crime | भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पोस्टमनचा मृत्यू

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

भोर/पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा (Postman) दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर (Pune-Satara Highway) केळावडे गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर गुरुवारी सायंकाळी झाला. अपघातात (Pune Crime) दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नसरापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अशोक नामदेव भांडवलकर Ashok Namdev Bhandvalkar (वय-55 रा. केळावडे, ता. भोर) असे मृत्यू झालेल्या पोस्टमनचे नाव आहे. तर सिद्धार्थ राजेश देशमुख Siddharth Rajesh Deshmukh (वय-21 रा. आनंदनगर, वडगाव बुद्रुक) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थवर राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय रमेश भांडवलकर यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक भांडवलकर हे पुणे-सातारा महामार्गावरील केळावडे गावाच्या हद्दीत
एक कंपनीसमोरील रस्ता ओलांडत होते. त्यावेळी सिद्धार्थ त्याच्या दुचाकीवरुन पुण्याकडून भरधाव वेगात आला.
त्याच्या दुचाकीची धडक अशोक भांडवलकर यांना बसली.
यामध्ये गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | postman died in bike collision at bhor pune

 

हे देखील वाचा :

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचे आणखी एक अपयश, अजून एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेला?

Jayant Patil On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत’ – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Uday Samant | ‘महाराष्ट्रातील उद्योजकांना विकास करण्यासाठी ताकदीचा मुख्यमंत्री मिळावा म्हणून आम्ही राजकीय पाऊल उचलले; कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’

 

Related Posts