IMPIMP

Pune Crime | पुणे शहरातील विविध न्यायालयात कार्यरत असणाऱ्या दोन बनावट जामीनदार देणार्‍या टोळ्या गजाआड, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

by nagesh
Pune ATS | no evidence of terror link pune court gives bail to two who arrested by ats for allegedly recruiting for lashkar e taiba pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील (Pune Crime) विविध न्यायालयात (pune court) कार्यरत असणाऱ्या दोन बनावट जामीदारांच्या टोळ्यांना (racket) पुणे गुन्हे शाखेने (Crime Branch Police) बेड्या ठोकल्या आहेत. शिवाजीनगर न्यायालय (Shivajinagar Court) आणि खडकी न्यायालयात (khadki court) करण्यात आलेल्या दोन कारवायांमध्ये गुन्हे शाखेने 10 जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी गुरुवारी (दि.11) सापळा रचून केली. आरोपींकडून (Pune Crime ) जामीनासाठी लागणारी बनावट कागदपत्र जप्त केली आहेत. (seeking bail through forged government documents)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत गोपाळ पुंडलिक कांगणे (वय-33 रा. मोरवडी, पिंपरी), सागर अनंत काटे (वय-25 रा. पिंपळे गुरव), इनकर सुंदर कांबळे
(वय-38 रा. आनंदनगर चिंचवड), हसन हाजी शेख (वय-25 रा. पिंपळे गुरव), रोहित विद्यासागर पुटगे (वय-24 रा. वैदववस्ती पिंपळे गुरव), किरण दादाभाऊ सुर्यवंशी (वय-27 रा. आनंद पार्क, आदर्शनगर, पिंपळे गुरव), रवि राजु वाघमारे (वय-29 रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 5 चे (Crime Branch Unit 5) पोलस उपनिरीक्षक सोमनाथ शेडगे (PSI Somnath Shedge)
यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

खडकी कोर्ट परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत मंगेश महादेव लोंढे (वय-31 रा. लोंढे वस्ती, पिंपळे सौदागर), सोनु हरि शिंदे (वय-20 रा. राजीव गांधी नगर पिंपळे गुरव),
सलीम सायधन शेख (वय-27 रा. पिंपळे गुरव) यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki police station) फिर्याद दिली आहे.
आरोपींकडून (Pune Crime) बनावट रेशनिंगकार्ड, आधारकार्ड, सातबारा उतारे, त्यांचे फोटो, रबरी शिक्के असे जमीन देण्यासाठी
आवश्यक असणारी शासकिय कागदपत्र जप्त करण्यात आली.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता जामीन देण्यासाठी आलो असल्याची कबुली आरोपींनी (Pune Crime) दिली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale) यांच्या सुचनेनुसार पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे
(DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad),
गुन्हे शाखेकडील विविध पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक भोसले, विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक खडके, शेडगे, जाधव,
संजय गायकवाड, गुंगा जगताप, टेंगले, काळे पोलीस अंमलदार मनोज साळुंके, संदिप जाधव, राहुल जोशी, मारुती पारधी, विशाल दळवी,
पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विश्वनाथ घोणे, गणेश लोखंडे, रेहाना सेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | pune police crime branch arrest two gangs who give fake bail bonds in various courts of Pune city

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 37 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

EPFO | खुशखबर ! 6.47 कोटी लोकांच्या PF अकाऊंटमध्ये पोहचले व्याजाचे पैसे, जाणून घ्या कसा चेक करावा PF बॅलन्स

PMRDA | मनपा निवडणुकीत स्वबळाचा नारा देणार्‍या कॉंग्रेसला झटका; गटातटाच्या राजकारणात PMRDA नियोजन समितीची एकमेव जागा निवडूण आणण्यात ‘अपयश’

 

Related Posts