IMPIMP

Pune Crime | स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाची धाड; भाड्याने रिक्षा घेऊन थाटला जुगार

by nagesh
Pune Crime | Crime Branch raids address club, 12 people detained

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | स्वारगेट पोलिस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीतील एका पेट्रोल पंपावर समोर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) धाड टाकून जुगार खेळणारे व खेळविणारे अशा १२ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. विशेष म्हणजे सामाजिक सुरक्षा विभागाने सुरु केलेल्या धाडसत्रामुळे जुगार चालकांनी चक्क भाड्याने रिक्षा घेऊन त्यात जुगार घेत असल्याचे आढळून आले आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सामाजिक सुरक्षा विभागाला मार्केटयार्ड (Market Yard, Pune) पेट्रोल पंपाच्या समोर नवनाथ हॉटेलशेजारी (Navnath Hotel) असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली संतोष साठे (Santhosh Sathe) याच्या रिक्षामध्ये बसून कल्याण मटका जुगार (Kalyan Matka) खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरुवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणारे ३, खेळवणारे २, व जुगार अड्डाचालक २ आणि पळून गेलेले ५ अशा १२ जणांवर कारवाई केली. (Pune Crime)

 

हा जुगार अड्डा चालवणारा मालक नामे साबीक्ष ऊर्फ शब्बीर ऊर्फ शाहू मोहम्मद शेख (Sabiksh alias Shabbir alias Shahu Mohammad Shaikh) हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्यावर यापुर्वी अनेक गुन्हे दाखल असूनही तो अद्यापही स्वारगेट हद्दीत अवैध धंदे (Illegal Business) चालवीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून सुरू असलेल्या छापा कारवायांमुळे आता मटका बहाद्दरांनी भाडोत्री रिक्षाचा वापर जुगारासाठी सुरु केला असल्याचे आढळून आले आहे. भाडोत्री रिक्षाचा दर दिवसाला ८०० ते १००० रुपये भाड्याने घेऊन त्यातच मटक्याचा जुगार सुरू होतो. त्यामुळे आसपासचे लोकांना समजतही नाही. परंतू या रिक्षाच्या आसपास पडलेल्या मटक्याचे चिठ्ठ्यावरुन पोलीसांनी ही कारवाई केली आणि त्यात रिक्षाही हस्तगत केली आहे.

 

जुगार खेळवणारे : तुषार रवींद्र विश्वमित्रे Tushar Ravindra Vishwamitre (वय २३, रा. महर्षीनगर),
सलीम उल्लाउद्दीन शेख Salim Ullauddin Shaikh (वय ३०, रा. फुलोरा हॉटेल, मार्केटयार्ड)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जुगार खेळणारे : श्रीकांत सिताराम म्हेत्रे Srikanth Sitaram Mhetre (वय ३४, रा. महर्षीनगर),
विजू नामदेव चांदणे Viju Namdev Chandane (वय ३३, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी),
इरफान सलीम बांगी Irrfan Salim Bangi (वय २३, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

जुगार अड्डा मालक शब्बीर ऊर्फ साबीर ऊर्फ शाहू मोहम्मद शेख (रा. इंदिरानगर, गुलटेकडी), रिक्षाचालक संतोष साठे (रा. इंदिरानगर, गुलटेकडी) व पळून गेलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

या कारवाईत ३ मोबाईल, रिक्षा, रोख रक्कम असा १ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner of Police Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ram Nath Pokle),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghatge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक पंढरकर (Sub-Inspector of Police Pandharkar),
पोलीस हवालदार मोहिते, राणे, पोलीस नाईक माने, जमदाडे, पठाण, कांबळे या पथकाने ही कारवाई केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : – Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell raids gambling dens in Swargate police station limits Gambling in rickshaw

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गंगाधाम रोडवर लिफ्ट मागणार्‍यांनी मारहाण करुन चोरुन नेली दुचाकी

Pune Crime | अल्पवयीन मुलीशी ‘संबंध’ ठेवल्याची पोलिसात तक्रार करण्याची धमकी; 67 लाख उकळणार्‍या हडपसर मधील दोघांना अटक, कोंढाव्यात FIR

Tata Group | टाटाच्या ‘या’ स्टॉकद्वारे होईल बंपर कमाई ! एक्सपर्टने 540 रुपयांच्या टार्गेट प्राईससह दिले Buy रेटिंग

 

Related Posts