IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 51 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Guptas 92nd MCOCA action till date against Criminals Nilesh Ghaiwal gang member and gang leader Rohit Akhade and his gang booked under mokka

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील (Pune Crime) मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या (Marketyard Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 51 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ मुन्ना सलीम शेख (Shah Rukh alias Munna Salim Shaikh) (वय-19 रा. गल्ली नं. 07, आंबेडकरनगर मार्केटयार्ड, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे (criminal) नाव आहेत. मुन्ना शेख याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Jail) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

मुन्ना शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलवार, कोयता यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने जबर दुखापत करणे, चोरी, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 03 गंभीर गुन्हे मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन गुन्हेगारावर एमपीडीए अ‍ॅक्ट (MPDA Act) अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे (senior police inspector Anagha Deshpande),
पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 51 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे.
त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Invoke MPDA Against Historysheeter Shah Rukh alias Munna Salim Shaikh

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खळबळजनक ! नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ! पुण्यात 19 वर्षीय तरुणीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार

PFRDA अंशधारकांची संख्या नोव्हेंबरमध्ये 22% वाढून 4.75 कोटींवर; 6 वर्षात या 59,190 कर्मचार्‍यांना दिव्यांग पेन्शनसुद्धा

 

Related Posts