IMPIMP

PFRDA अंशधारकांची संख्या नोव्हेंबरमध्ये 22% वाढून 4.75 कोटींवर; 6 वर्षात या 59,190 कर्मचार्‍यांना दिव्यांग पेन्शनसुद्धा

by nagesh
Employee Pension Scheme | employee pension scheme epfo pf account how long contribution will have to be made in eps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PFRDA | पेन्शन नियामक पीआरएफडीए (pension fund regulatory and development authority) अंतर्गत दोन प्रमुख पेन्शन योजनांतर्गत (pension schemes) अंशधारकांची संख्या यावर्षी नोव्हेंबरमध्ये 22 टक्केवरून वाढून 4.75 कोटी झाली. पेन्शन कोष नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) शुक्रवारी म्हटले की, नोव्हेंबर 2021 च्या अखेरपर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (National Pension System – NPS) अंतर्गत विविध योजनांमध्ये अंशधारकांची संख्या वार्षिक आधारावर 22.45 टक्के वाढून 475.87 लाख झाली. नोव्हेंबर 2020 मध्ये ही संख्या 388.62 लाख होती.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

PFRDA एनुसार 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत व्यवस्थापनांतर्गत एकुण पेन्शन संपत्ती वाढून 6,87,468 कोटी रुपयांवर पोहचली. वार्षिक आधारावर यामध्ये 29.13 टक्के वाढ झाली आहे.

पीएफआरडीएच्या आकड्यांनुसार राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या (एनपीएस) केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांच्या (Central and State Government employees) श्रेणीत अंशधारकांची संख्या अनुक्रमे 4.71 टक्के आणि 9.74 टक्के वाढून 22.44 लाख आणि 54.44 लाख झाली.

 

तर, कॉर्पोरेट आणि एनपीएसच्या सर्व नागरी क्षेत्रात अंशधारकांची संख्या अनुक्रमे 23.73 टक्के आणि 33.81 टक्के वाढून 13.19 लाख आणि 18.88 लाखावर पोहचली. एनपीएस लाईटच्या अंतर्गत ग्राहकांची संख्या 2.78 टक्के कमी होऊन 41.92 लाख झाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

अटल पेन्शन योजनेंतर्गत (Atal Pension Scheme) अंशधारकांची संख्या समीक्षाधीन महिन्यात 30.16 टक्के वाढून 3.25 कोटींवर पोहचली पीएफआरडीएच्या दोन प्रमुख पेन्शन योजना एनपीएस आणि अटल पेन्शन योजना (NPS and Atal Pension Scheme) आहेत.

 

2016 पासून या कर्मचार्‍यांना दिव्यांग पेन्शन – सरकार :
दरम्यान, सरकारने शुक्रवारी म्हटले की, 2016 पासून आतापर्यंत सशस्त्र दलांच्या 59,190 कर्मचार्‍यांना दिव्यांग पेन्शन दिली आहे. सेवेच्या दरम्यान एखाद्या शारीरीक अपंगात्वामुळे सेवेतून बाहेर झालेले सशस्त्र दलाचे कर्मचारी दिव्यांग पेन्शनसाठी पात्र असतात.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट (Minister of State for Defense Ajay Bhatt)
यांनी लोकसभेत (Lok Sabha) एक प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले की,
2016 मध्ये 6,851 कर्मचार्‍यांना दिव्यांग पेन्शन (disability pension) दिली गेली,
तर 2017 मध्ये ही संख्या वाढून 10,554 आणि 2018 मध्ये 12,321 झाली.
त्यांनी उत्तरात म्हटले की, 2019 मध्ये 12,971 कर्मचार्‍यांना पेन्शन दिली गेली,
2020 मध्ये 12,149 आणि सध्याच्या वर्षात 4,344 लोकांना दिव्यांग पेन्शन दिली गेली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

प्रादेशिक सैन्याच्या माजी सैनिकाला अपंगत्व पेन्शन देण्याचे निर्देश
(instructions to be given disability pension to the ex-serviceman of the regional army):

तिकडे, सर्वोच्च न्यायालयाने 80 टक्के अपंगत्वाने पीडित प्रादेशिक सैन्याच्या (टेरिटोरियल आर्मी) एका जवानाला अपंगत्व पेन्शन देण्याचे शुक्रवारी निर्देश दिले.

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई (Justice L. Nageshwar Rao and Justice B. R. Gavai)
यांच्या खंडपीठाने म्हटले की, लष्करासाठी पेन्शन नियम, 1961 (Pension Rules for the Army, 1961)
नुसार, एक व्यक्ती सैन्य सेवेदरम्यान युद्ध न करताच अपंग झाला आणि
त्याच्या अपंगात्वाची टक्केवारी 20 टक्केपेक्षा जास्त असेल तर तो निवृत्ती पेन्शनसाठी पात्र असेल.

 

Web Title :- PFRDA | pension fund regulatory and development authority pfrda subscriber base rises 22 pc to 4 75 cr in nov

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मायलेकीची गळफास घेऊन आत्महत्या, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Vicky Kaushal | लग्नाच्या 10 दिवसांनी शुटिंगवर परतला विकी कौशल, चाहत्यांनी विचारले – ‘भाऊ कतरिना वहिनी कुठे आहे?’

Pune Crime | आळंदीत वारकरी संप्रादायीतील तरुणाची आत्महत्या

 

Related Posts