IMPIMP

Pune Crime | विश्रांतवाडीत ‘खुलेआम’ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाचा छापा

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शहरात अवैध धंदे (Illegal Trades In Pune) बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील वज्रेश्वरी मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जुगार अड्डा (Gambling Den) सुरु असल्याचे आढळून आले. परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्या कार्यालयातील विशेष पथकाने येथे शुक्रवारी रात्री छापा घालून चौघा जणांना पकडले. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मनीष हरिश्चंद्र नरे (वय 32, रा. चर्‍होली), रफिक मगदूम शेख (वय 50, रा. शांतीनगर वसाहत, भोसरी), चेतन सुखदेव शेलार (वय 24, रा. विश्रांतवाडी) आणि बंटी ऊर्फ सुरज त्रिवेणी मिश्रा (वय 35, रा. विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी पोलीस अंमलदार शाम कारभारी शिंदे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोणतेही अवैध धंदे सुरु (Illegal Business In Pune) असता कामा नये, असे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी दिले आहेत.
तसेच सर्व परिमंडळांच्या पोलीस उपायुक्तांना (All DCP’s In Pune) त्यांनी त्यांच्या हद्दीत कोणतेही अवैध धंदे सुरु राहणार नाहीत.
कोठे सुरु असल्याचे आढळून आल्यावर त्यावर कारवाई (Pune Police Action) करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार परिमंडळ 4 च्या हद्दीत विशेष पथकामार्फत (Pune Police Special Squads) कारवाई करण्यात येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विश्रांतवाडी येथील वज्रेश्वरी मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत आडोशाला जुगार अड्डा (Gambling Den In Pune) सुरु असल्याची माहिती या विशेष पथकाला मिळाली.
त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सर्वे नंबर 112 येथे पोलिसांनी छापा घालून जुगार खेळणार्‍या चौघांना पकडले.
त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व 3 हजार 100 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते (PSI Lahu Satpute) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Special team of Deputy Commissioner of Police Rohidas Pawar raids gambling den in Vishrantwadi are

 

हे देखील वाचा :

Pune NCP | PM नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ‘मोदी गो बॅक’ आंदोलन

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समितीने अखेरच्या बैठकीत 2500 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना एकमताने दिली मान्यता; नदी सुधार, नदी काठ सुधार, पीपीपी तत्वावरील रस्त्यांच्या कामांचे कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर

Pune NCP | ‘5 वर्षे तुमची सत्ता होती, तुमचे मालक गृहमंत्री होते, तेव्हा का नाही सुचलं हे शहाणपण?’ पुणे राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

 

Related Posts