IMPIMP

Asteroid | पृथ्वीवर विध्वंस करू शकतो अ‍ॅस्टरॉईड बेन्नू, NASA ने सांगितले केव्हा होऊ शकते ‘धडक’

by nagesh
asteroid the size of empire state building may hit earth in the 2100s report

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–   Asteroid | अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाने (NASA) या आठवड्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, बेन्नू नावाचा एक अ‍ॅस्टरॉईड (Asteroid) जो न्यूयॉर्कमधील अ‍ॅम्पायर स्टेट बिल्डिंग इतका मोठा आहे, तो पृथ्वीसोबत धडकू शकतो. परंतु असे कधी होईल याबाबत नासाने आता स्थिती स्पष्ट केली आहे. बेन्नू 2300 पर्यंत पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 1,750 पैकी एक आहे.

 

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञ डेव्हिड फार्नोचिया, ज्यांनी 17 इतर शास्त्रज्ञांसह, पृथ्वीजवळ अ‍ॅस्टरॉइड (101955) बेन्नूच्या धोक्याबाबत संशोधन केले होते.
न्यूयॉर्क टाइम्सला त्यांनी सांगितले की, याच्या प्रभावाची शक्यता अजूनही कमी आहे.
मी पहिल्याच्या तुलनेत बेन्नूबाबत जास्त चिंतीत नाही.
त्याच्या प्रभावाची वास्तविक शक्यता कमी आहे.
OSIRIS-REx च्या मदतीने Bennu वर संशोधन करण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

किती जवळ येईल बेन्नू?

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हा अ‍ॅस्टरॉईड 2135 पर्यंत पृथ्वीच्या 125,000 मैलच्या कक्षेत येईल जी पृथ्वीपासून चंद्राच्या अंतराच्या जवळपास निम्मी आहे.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, येथे अचूक अंतर महत्वाचे आहे.
शास्त्रज्ञांनी इशारा दिला की, 24 सप्टेंबर 2182 चा दिवस धोकादायक ठरू शकतो.

मात्र, बेन्नू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता केवळ 0.037 टक्के आहे.
त्यांनी हे सुद्धा आश्वासन दिले की, यातून नष्ट होण्याची घटना होणार नाही परंतु विध्वंस खुप मोठा होऊ शकतो.
नासामध्ये ग्रह संरक्षण अधिकारी म्हणून काम करणारे लिंडली जॉन्सन यांनी म्हटले की, क्रेटरचा आकार वस्तूच्या आकारापेक्षा 10 ते 20 पट असेल.

 

 

Web Title : asteroid the size of empire state building may hit earth in the 2100s report

 

हे देखील वाचा :

RBI Issued Fraud Alert | तुम्ही देखील ‘हे’ नंबर कोणासोबत शेअर केलेत? तर मग व्हा सावध, RBI नं जारी केला अलर्ट; जाणून घ्या

Ayurveda Expert Balaji Tambe | आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांचे निधन कोरोनाने?

Pune Crime | तुझी ‘गारवा हॉटेलमालका’सारखी गत होईल; जमिनीच्या वादातून धमकी देणार्‍या 5 जणांवर FIR दाखल

 

Related Posts