IMPIMP

Pune Crime | पुण्यात हाय टेन्शन वायरखाली अडकून भाजीविक्रेत्या तरुणाचा मृत्यू

by nagesh
Pune Crime News | Kothrud Police Station: One killed, another critically injured due to electrocution from high voltage power line

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढल्याने शहरात झाडाच्या फांद्या पडल्याने विद्यूत वाहक तारा तुटून पडण्याचे प्रकार सतत घडत आहेत. आज सकाळी सिंहगड रोडवरील (Sinhagad Raod) दत्तवाडी (Dattawadi, Pune) येथे सवाई हॉटेलजवळ (Hotel Savai) महावितरणची उच्च दाबाची (MSEB High Tension Wire) तार पडल्याने एका 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. मृत तरूणाचे नाव रोहित संपत थोरात असे आहे. (Pune Crime)

 

आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रोहित थोरात हा भाजीविक्रेता आहे. सकाळी तो दूध आणण्यासाठी जात असताना ही घटना घडली. विजेच्या धक्क्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे का ? याची चौकशी केली जात आहे. दत्तवाडी येथील सवाई हॉटेल चौकात उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटून पदपथावर पडल्याचे मेसेज आज सकाळपासून सोशल मीडियावर फिरत होते. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मुलगा अचानक गेल्याने थोरात कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

दरम्यान, पाऊस संततधार कोसळत असल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे.
खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. चार प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील चार दिवस पाऊस असाच कोसळणार आहे.

 

पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पावसाने राज्यात जुलैची सरासरी ओलांडली आहे. कोकण, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर,
तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.

 

Web Title :- Pune Crime | vegetable seller dies after falling under high tension wire in pune crime news

 

हे देखील वाचा :

Salman Khan | सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती 4 लाखांची रायफल – गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं

Pune News | शेतातील खड्ड्याने घेतला तीन चिमुकल्या भावंडांचा जीव

Maharashtra Political Crisis | ‘बंडखोरांच्या गळ्यात ‘पट्टा’ आणि ‘साखळी’ भाजपाच्या हातात, परत आणण्याचे प्रयत्न नकोत’; सेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला

OBC Political Reservation Maharashtra | राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच – सर्वोच्च न्यायालय

 

Related Posts