IMPIMP

Pune Crime | ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत येरवडा येथील मुळीक कॉम्प्लेक्स मध्ये वाहनांची तोडफोड, तरुणावर वार; 4 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station - Beating on forehead with scissors for minor reason

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दोन वर्षापूर्वी रंग खेळताना झालेल्या वादाचा राग मनात धरुन सराईत गुन्हेगारांनी (Criminals)
सोसायटीच्या पार्किंग मध्ये (Society Parking) पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) केली. तसेच एका तरुणावर (Youth) धारधार पालघने मानेवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. हा प्रकार पुणे शहरातील (Pune Crime) येरवडा (Yerwada) येथील मुळीक कॉम्प्लेक्समध्ये (Mulik Complex) बुधवारी (दि.30) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

सोनू सुनील शिंदे Sonu Sunil Shinde (वय-26 रा. मुळीक कॉम्प्लेक्स, रामवाडी जकातनाका, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्वीन फतोडी, शुभम उबाळे, शुभम कासवेकर (पूर्ण नाव माहित नाही), शहबाज शेख (रा. येरवडा, पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुभम उबाळे आणि शुभम कासवेकर हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनू शिंदे आणि आरोपी शहबाज शेख हे तोंडओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये दोन वर्षापूर्वी रंग खेळण्यावरुन वाद झाला झाला होता. याचा राग मनात धरुन आरोपी शहबाज शेख याने इतर साथिदारांच्या मदतीने फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंमधील वाहनांची तोडफोड केली. आरोपींनी 3 दुचाकी, 1 चारचाकी व 2 तीन चाकी वाहनांची धारदार हत्याराने तोडफोड केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यावेळी फर्यादी हे तुम्ही गाड्यांची तोडफोक का करत आहेत असे विचारले असता शहबाज याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन
‘तेरे साथ अपना पुराना हिसाब बाकी है, आज तेरे को उपर भेजके हिसाब पुरा करुंगा’ असे
म्हणत हातातील धारदार पालघने फिर्यादी यांच्या मानेवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यानंतर आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत ‘आम्हाला कोणी अडवु शकत नाही आम्ही येथील भाई आहोत’ असे
म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करपे (API Karpe) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Vehicle vandalism in the mulik complex at Yerawada saying ‘we are bhai here’, attack on youth; FIR against 4 persons

 

हे देखील वाचा :

Compulsory Helmet Rule In Pune | पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा – कॉलेजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Benefits of Onion | उन्हाळ्यात कांदा खाल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे; जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | पुण्यातील लोणीकंद परिसरात पाळीव श्वानावरून शेजाऱ्यांमध्ये ‘राडा’, 4 जणांवर FIR

 

Related Posts