IMPIMP

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून वडगावमध्ये युवकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ

by nagesh
Jalna Crime News | 18 year old boy stabs 8 year old brother to death in jalna

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका युवकावर लोखंडी कोयते आणि तलवारीने डोक्यात
आणि शरीरावर सपासप वार करुन निर्घृण खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) वडगाव मावळ
(Wadgaon Maval) येथे घडली असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. मागील तीन महिन्यातील हा दुसरा खून आहे. विश्वजित राजेंद्र
देशमुख Vishwajit Rajendra Deshmukh (वय – 22 रा. संस्कृती सोसायटी, वडगाव ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत महेश काशिनाथ गायकवाड Mahesh Kashinath Gaikwad (वय – 28 रा. वारंगवाडी) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात (Wadgaon Maval Police Station) फिर्याद दिली आहे. या घटनेमध्ये फिर्यादी आणि अभिषेक अनंत मोरे (Abhishek Anant More) हे जखमी झाले आहेत. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव हद्दीतीतील मातोश्री हॉस्पिटल जवळील बस स्टॉपसमोर रोडवर पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास 10 ते 12 अनोळखी इसमांनी मोटार सायकलवरुन येऊन त्यांच्या हातातील लोखंडी कोयते व तलवारीने विश्वजीत याच्या डोक्यात, पाठीवर वार करुन त्याचा निर्घृण खून केला. तसेच यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महेश गायकवाड व अभिषेक मोरे यांच्यावरही वार करण्यात आले. तसेच त्यांच्या गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केल्याचे फिर्यादी महेश गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

 

घटनास्थळी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक दिपेश गट्टे (Addl SP Dipesh Gatte),
पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले (Deputy Superintendent of Police Bhausaheb Dhole) यांनी घटनास्थळाला भेट दिली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले (Senior Police Inspector Vilas Bhosale) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | youth from wadgaon was killed with a sharp weapon and two others were injured in attack pune rural police wadgaon maval

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | सदाभाऊंच्या माघारीनंतर मिटकरींचे ट्विट, म्हणाले- ‘सदाभाऊंना उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी…’

Vidhan Parishad Election 2022 | विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे, रंगत वाढली

LIC च्या या योजनेत ज्येष्ठांना दरमहिना मिळेल 9250 रुपये पेन्शन, पती-पत्नीला मिळू शकतो दुप्पट लाभ, जाणून घ्या सर्वकाही

 

Related Posts