IMPIMP

Pune Crime | पुण्यात पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, 5 जणांना अटक

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात
घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) पांडवनगर (Pandavanagar) येथे सोमवारी (24) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे.
आरोपींनी तरुणावर वार करुन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (chaturshringi Police Station) 5
जणांना अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सलीम जावेद शेख असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विजय चंद्रकांत विटकर (वय-19), मयूर सुनिल विटकर (वय-21), अतुल अनिल धोत्रे (वय-23), सागर विनायक मंगळवेढेकर, प्रणव अर्जुन झडपे (वय22 सर्व रा. वडारवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. साहील विटकर आणि आकाश ओरसे हे फरार आहेत. याबाबत अली जावेद शेख (वय-23 रा. मजाळकर चौकाजवळ, वडारवाडी, पुणे) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार (API Sandeep Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय विटकर आणि जखमी सलीम यांच्यामध्ये पूर्वी भांडण (Dispute) झाले होते. या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी रात्री फिर्यादी यांचा भाऊ सलीम व त्याचे मित्र शुभम दुबळे, मानव शेलार हे उत्तरादेवी जिमच्या (Uttaradevi Gym) समोर शेकोटी करुन गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी विजय विटकर हा आपल्या साथिदारांसह त्याठिकाणी आला.

 

 

विजय विटकर याने सलीमला ‘तुला लय माज आला आहे, तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत त्याचा शर्ट पकडून शिवीगाळ करुन हातातील लोखंडी कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच इतर साथिदारांनी लोखंडी रॉड व बांबुने मारहाण (Beating) केली. सलीम याचे मित्र शुभम आणि मानव हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच ‘आमच्या भांडणात पडला तर कोणालाच जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी (Threat) दिली. त्यानंतर आरोपी परिसरात दहशत निर्माण करुन जोरजोरात ओरडत निघून गेले. या घटनेत सलीम शेख हा गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Pune Crime | youth was attacked with a scythe, 5 people were arrested in pune chaturshringi Police Station

 

हे देखील वाचा :

Shilpa Shetty Viral Kiss Video | भर कार्यक्रमामध्ये शिल्पा शेट्टीनं केलं होतं KISS, ज्यामुळे तिला तब्बल 15 वर्ष न्यायालयानं ठेवलं जखडून; पाहा व्हायरल व्हिडिओ

Samantha-Allu Arjun | समंथाच्या घटस्फोटानंतर अल्लू अर्जुननं बदललं तिचं नशीब, तिच्यासाठी अल्लू अर्जुन ठरला लकी..

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळू शकते चांगली बातमी, 18 महिन्याच्या थकीत डीए एरियरवर होणार निर्णय

 

Related Posts