IMPIMP

Pune Cyber Crime | पुण्यात सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (ACP) सायबर चोरट्याने घातला गंडा

by nagesh
Pune Cyber Crime | In Pune a retired Assistant Commissioner of Police (ACP) cyber thief pune cyber crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Cyber Crime | बँका आणि पोलिसांकडून कोणालाही ओटीपी अथवा आपला गोपनीय क्रमांक सांगू नका असे वारंवार आवाहन केले जात असते. असे असताना एका सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) केवायसी अपडेटच्या (KYC Updates) नावाखाली गंडा घातला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी बालेवाडी (Balewadi News) येथे राहणार्‍या ६३ वर्षांच्या सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी सहायक पोलीस आयुक्तांना मोबाईलवर फोन करुन तुमचे सीम कार्ड केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना लिंक पाठवून ती लिंक अपलोड करायला सांगितली. त्यानंतर आलेला ओटीपी त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर फिर्यादी यांच्या स्टेट बँक खात्यातून (SBI Account) परस्पर ४९ हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेतले. हा प्रकार ३ जुलै २०२१ रोजी घडला होता. त्यानंतर आता गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Cyber Crime | In Pune a retired Assistant Commissioner of Police (ACP) cyber thief pune cyber crime

 

हे देखील वाचा :

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ लागोपाठ दुसर्‍या दिवशी अपघात; बोअरवेल ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ‘विजय कुलकर्णी’ जागीच ठार

Corona New Cases In India | कोरोना केसमध्ये 6.4% घट ! गेल्या 24 तासात कोविड-19 च्या 1 लाख 68 हजार नवीन केस, 277 जणांचा मृत्यू

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

 

Related Posts