IMPIMP

Pune Cyber Crime | कॉलेजची फी भरण्यासाठी कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात तिच्या वाट्याला आली बदनामी; लोहगावमधील 21 वर्षीय तरूणीसोबत घडलेला प्रकार

by nagesh
Pune Cyber Crime | Trying to get a loan to pay college fees brought her into disrepute What happened to a 21 year old girl from Lohgaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Cyber Crime | शिक्षणाच्या ओढीने तिने कॉलेजची फी भरण्यासाठी ऑनलाईन कर्ज (Online Loan Application) घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून तिच्या वाट्याला बदनामीच आली. ऑनलाईन कर्जाच्या या सायबर चोरट्यांच्या (Pune Cyber Crime) फसवणुकीत (Cheating Case) आणखी एक तरुणी बदनामीची शिकार ठरली आहे.

 

याप्रकरणी लोहगाव (Lohegaon, Pune) येथील एका २१ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६०/२२) दिली आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारी ते ११ जुलै २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Cyber Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कॉलेज शिक्षण घेत आहेत.
त्यांना कॉलेजची फी भरण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरुन कोको अ‍ॅप डाऊनलोड केले.
सर्व माहिती अपलोड केली. त्यानंतर त्यांना झारखंडवरुन फोन येऊ लागले.
त्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे व फोटोतील चेहर्‍याचा वापर करुन पॉर्न व्हिडिओ (Porn Video), न्यूड फोटो (Nude Photos) तयार केले.
हे फोटो व व्हिडिओ त्यांना पाठवले. ते सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मैत्रिणीला या मार्फ केलेले व्हिडिओ व फोटो पाठवून बदनामी केली.

 

 

Web Title :- Pune Cyber Crime | Trying to get a loan to pay college fees brought her into disrepute What happened to a 21 year old girl from Lohgaon

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना टॅग करून संजय राऊतांनी केलं ट्विट, म्हणाले – ‘…अब सभी को सभी से खतरा है’

Rain In Maharashtra | पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 4 दिवस सतर्क रहा

Pune Crime | सिक्युरिटी गार्डच्या पगारातील निम्मे पैसे हडपणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल; कामगारांच्या प्रयत्नानंतर तब्बल 4 महिन्यांनी गुन्हा दाखल

Aditya Thackeray – Aarey Protest | राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस ! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

 

Related Posts