IMPIMP

Pune Fire News | लुल्लानगरमधील सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग

by nagesh
Pune Fire News | A massive fire broke out on the seventh floor of a hotel in Lullanagar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Fire News | कोंढव्यातील लुल्लानगर (Lullanagar, Kondhwa) चौक येथील मार्वल विस्टा इमारतीतील (Marvel Vista Building) सातव्या मजल्यावरील हॉटेलला मंगळवारी सकाळी भीषण आग (Pune Fire News) लागली. ही आग इतकी मोठी होती की काही मिनिटातच संपूर्ण हॉटेल या आगीत जळून खाक झाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लुल्लानगर चौकात मार्वल विस्टा ही इमारतीत सातव्या मजल्यावर व्हेजिटा हे रुफ टॉप हॉटेल (Vegeta Hotel) आहे. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाला (Fire Brigade) आगीच्या घटनेची माहिती सकाळी ८ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशमन दलाची ३ वाहने, २ टॅकर घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आगीने मोठे रौद्र स्वरुप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे काम सुरु केले. जवळपास अर्धा तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. आग विझविल्यानंतर आता कुलिंगचे काम सुरु आहे. आग कशी लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

 

Web Title :- Pune Fire News | A massive fire broke out on the seventh floor of a hotel in Lullanagar

 

हे देखील वाचा :

India Squad NZ Series | न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे देण्यात आहे कर्णधारपद

Mumbai Indians | ज्युनियर ‘एबीडी’नं केला ‘हा’ मोठा पराक्रम, मुंबई इंडियन्स झाली खुश

Gas Cylinder Price | महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा ! गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची कपात

Pune PMC News | काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या रस्ते ठेकेदारांचा अंतिम अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठविणार – अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार

 

Related Posts