IMPIMP

Pune Loni Kalbhor Crime | दुकानातील कामगाराने केला सव्वा कोटींचा अपहार, कुंजीरवाडी परिसरातील घटना

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Loni Kalbhor Crime | शेती मालाच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने एक कोटी 29 लाख रुपयांचे पेमेंट स्वतःच्या पत्नीच्या नावावर असलेल्या बँक खात्यावर जमा करुन घेतले. तसेच त्याचा अपहार केला (Embezzlement Case). याप्रकरणी कामगारावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 पूर्वी वेळोवेळी घडला आहे.

याबाबत संदिप सुखराज धुमाळ (वय-54 रा. कुंजीरवाडी) यांनी मंगळवारी (दि.19) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विकास रामराव धोंगते (वय-42 रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Loni Kalbhor Crime)पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुंजीरवाडी मध्ये श्रीनाथ शेती भांडार नावाचे दुकान आहे.

तिथे आरोपी विकास हा काम करत होता. विकास याने ग्राहकांना दुकानातील कृषी उपयोगी बी बियाणाचा माल ग्राहकांना विक्री केला.
ग्राहकांना विक्री केलेल्या मालाचे 1 कोटी 29 लाख 10 हजार 440 रुपयांपेक्षा जास्त रक्कम दुकानाच्या बँक खात्यावर जमा केली नाही.
आरोपीने ग्राहकांकडून घेतलेली रोख रक्कम पत्नीच्या व नर्सरीच्या नावावर असलेल्या बँक खात्यात जमा करुन घेतली. त्याने पैशांचा अपहार करुन फिर्यादी यांच्याकडील काम सोडून पळून गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

Apla Pune Cyclothon | आपला पुणे सायक्लोथॉन स्पर्धेत ओम कारंडे, बिजेन कुमार, मायकेल लेहनिग, अंजली रानवडे, आर हरिणी श्री, अंजली भालिंगे यांना विजेतेपद

Related Posts