IMPIMP

Gold Price Today | खुशखबर ! सोने 11,000 रूपयांनी झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी ‘घसरण’; जाणून घ्या नवीन दर

by nagesh
gold price today down fall 11000 rupees from record level silver price also drop check 11 august rate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोन्याची खरेदी (Gold Price Today) करणार्‍यांसाठी मोठी खुशखबर आहे. सोने चार महिन्यांच्या खालच्या स्तरावर आले आहे. होय, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याची किंमत 46,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खालच्या स्तरावर (Gold Price Today) घसरल्यानंतर 4 महिन्याच्या खालच्या स्तरावर पोहचली आहे. एमसीएक्सवर मागील तीन व्यवहारांच्या सत्रात सोने वायदा सुमारे 1.3 टक्के घसरला. तर या कालावधीत चांदीची किंमत 1.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरली.

आज बुधवारी सोन्याच्या किंमतीत हलकी वाढ होती. एमसीएक्सवर आज सकाळी व्यवहाराच्या सत्रात, सोने 0.13 टक्केच्या किरकोळ वाढीसह ट्रेड करत आहे. तर, चांदीच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. यापूर्वी मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोने 176 रुपयांच्या घसरणीसह 45,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. चांदीची किंमत सुद्धा 898 रुपयांनी घसरून 61,715 रुपये प्रति किलोग्रॅम राहिली. आंतरराष्ट्रीय  बाजारात सोने लाभासह 1,735 डॉलर प्रति औंस झाले तर चांदी कोणत्याही बदलाशिवाय 23.56 डॉलर प्रति औंसवर राहिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

सोने 11 हजार रुपये स्वस्त

सध्या सोन्याची किंमत आपल्या ऑल टाइम हायपासून 11,000 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त घसरली आहे. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने 56,200 रुपयांच्या उच्चतम स्तरापर्यंत गेले होते. सध्या सोने सराफा बाजारात 45,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण आहे. जर सोन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे.

 

एक्सपर्टनुसार, सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. वर्षाच्या अखेरपर्यंत चांगले रिटर्न मिळू शकते. मागच्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिले होते. त्याच्या मागच्या वषी सुद्धा सोन्याचा रिटर्न सुमारे 25 टक्के होता. जर तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणुक करणार असाल तर सोने अजूनही गुंतवणुकीसाठी अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

– आज नवी दिल्लीत सोन्याची किंमत 45,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

– मुंबईत सोने 45,280 रुपयांनी विकले जात आहे.

– चेन्नईत ते 43,730 रुपयांवर आहे.

तज्ज्ञांनुसार, सोन्यातील ही घसरण अमेरिकन डॉलरची मजबूती आणि अमेरिकन नोकरीच्या आकड्यांमुळे आहे. मात्र, जानकारांनुसार,  आंतरराष्ट्रीय    बाजारात सोन्याची किंमत 1680 डॉलर प्रति औंसवर राहू शकते. तर एमसीएक्सवर 44,700 रुपये ते 45,300 प्रति 10 ग्रॅम राहण्याची शक्यता आहे.

 

Web Title : gold price today down fall 11000 rupees from record level silver price also drop check 11 august rate

 

हे देखील वाचा :

Crime News | तेलंगणात भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाला जिवंत जाळले

Pune Crime | पुण्यात डॉक्टर महिलेच्या कारच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यु; कोरेगाव पार्कमध्ये डॉ. मेघना चावला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Anti Corruption Nashik | 8 लाखांच्या लाच प्रकरणी महिला शिक्षणाधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; महासंचालकांच्या आदेशाने ठाणे ACB कडून नाशिकमध्ये कारवाई, प्रचंड खळबळ

Blood Donation Camp | आचार्य आनंदऋषी यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Pune Police | हद्दीत अवैध धंदे सुरु असल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरणार

Taliban Terrorism | अफगाणिस्तानमध्ये राहणार्‍या भारतीयांसाठी सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी जारी, ’तात्काळ’ मायदेशी परतण्याचा सल्ला

Central Government | जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? केंद्र सरकारकडून संसदेत माहिती सादर

 

 

Related Posts