IMPIMP

Pune News | कलवड वस्ती येथे युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि. पुणे चे उद्घाटन ! सामान्य लोकांसाठी निधी बँक हा चांगला पर्याय : डॉ. एम.एल. सुखदेवे

by nagesh
Pune News | Yugapravartak Urban Nidhi Bank Ltd. at Kalwad Vasti. Inauguration of Pune! Nidhi Bank is a good option for common people: Dr. M.L. Sukhdeve

पुणे – लोहगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | आपल्या लोकांनी आपल्यासाठी निर्माण केलेली बँक म्हणजेच निधी बँक (Nidhi Bank) आहे. समाज सुधारण्याचा हा एक महत्वाचा टप्पा आहे. सामान्य लोकांसाठी निधी बँक हा चांगला पर्याय आहे. असे प्रतिपादन नाबार्ड बँकेचे माजी जनरल मॅनेजर डॉ. एम.एल. सुखदेवे यांनी नुकतेच केले. (Pune News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

लोहगाव परिसरातील कलवड वस्ती येथे युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि. पुणे चे उद्घाटन डॉ. एम.एल. सुखदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सी.ए. प्रतिक जानराव, ऍड्. आनंद चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. सुखदेवे आपल्या भाषणात म्हणाले कि प्राथमिक गरजांसाठी नेहमीच समाज झगडत राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे मोठ्या प्रमाणात बदल समाजात घडला आहे. आजही समाजाच्या अनेक गरजा आहेत, त्या गरजा देखील आपणच पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी निधी बँक हा अत्यंत चांगला पर्याय आहे. नियमांचे योग्य पालन आणि चांगले व्यवस्थापन केल्यास काहीच अडचण येत नाही. व्यवस्थापन नीट असेल तर कोणतीही संस्था अडचणीत येत नाही. मॅनेजमेंट ने समाजात विश्‍वास निर्माण केला तर बँक जरूर यशस्वी होणार, असे त्यांनी सांगितले. (Pune News)

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि. पुणे चे मुख्य प्रवर्तक धनराज जावळे यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्य प्रवर्तक संतोष पाटील यांनी मानले. मुख्य प्रवर्तक राहुलदीप खोब्रागडे, डॉ. संघमित्रा खोब्रागडे, संघमित्रा बेंगळे, रमेश ओव्हाळ, ज्ञानदेव अडसूळ, आनंद राजुसकर, महादेव धिवार या सर्व प्रवर्तकांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.

 

यावेळी बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे पदाधिकारी, अर्थदिप पतसंस्थेचे पदाधिकारी, जेतवन निधी बँकेचे पदाधिकारी, नागलोक निधी बँकेचे पदाधिकारी, सिद्धार्थ बुद्धविहाराचे पदाधिकारी व सभासद, सावित्रीबाई महिला मंडळाच्या पदाधिकारी महिला सभासद, आम्रपाली बुद्ध विहाराचे पदाधिकारी व सभासद, युगप्रवर्तक अर्बन निधी बँकेचे सभासद व संपूर्ण संचालक तसेच पुणे शहराच्या विविध भागातून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune News | Yugapravartak Urban Nidhi Bank Ltd. at Kalwad Vasti. Inauguration of Pune! Nidhi Bank is a good option for common people: Dr. M.L. Sukhdeve

 

हे देखील वाचा :

Income Tax Return | ITR भरण्यासाठी कसा निवडावा योग्य फॉर्म ? येथे जाणून घ्या याची ABCD

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

WhatsApp Call Record | व्हॉट्सअ‍ॅप काॅल कसा Record करायचा?; जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया

 

Related Posts