IMPIMP

Pune Rain | अखेर तो आला ! खडकवासला धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात

by nagesh
Khadakwasla Dam Pune | The release of water from Khadakwasla Dam was stopped

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Rain | संपूर्ण जून महिन्यात चाताकासारखी वाट पहात असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना आजच्या दिवसाची सुरुवात सुखदायक झाली आहे. पुणे शहराला (Pune City) पाणी पुरवठा (Water Supply) करणार्‍या खडकवासला (Khadakwasla) प्रकल्पात अखेर पावसाला (Pune Rain) सुरुवात झाली आहे. पानशेत, टेमघर (Temghar), वरसगाव (Varasgaon), मुळशी धरण (Mulshi Dam) क्षेत्रात या जूनमध्ये अतिशय किरकोळ पाऊस झाला होता. 1 जुलैला प्रथमच थोडा मोठा पाऊस झाला आहे. संपूर्ण जूनमध्ये जेवढा पाऊस पडला. त्याच्या जवळपास निम्मा पाऊस गेल्या 24 तासात झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या 24 तासात 1 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पडलेला पाऊस Pune Rain (एकूण पाऊस मिमी)

मुळशी – 47 (114)

टेमघर – 38 (103)

वरसगाव – 20 (101)

पानशेत (Panshet) – 21 (107)

खडकवासल – 4 (21)

गुंजवणी – 28 (126)

पवना (Pavana) – 27 (70)

 

पुणे शहरात पाणी कपातीचे संकट
खडकवासला प्रकल्पातील पाणी साठा अतिशय खाली गेल्याने येत्या सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेने (Municipal Corporation) जाहीर केले आहे. गेल्या वर्षी खडकवासला धरण प्रकल्पात 8.61 टीएमसी पाणी साठा होता. आज केवळ 2.55 टीएमसी पाणी साठा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला नाही तर शहरातील पाणी कपात आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

 

पुणे शहरातही गुरुवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिमी)

शिवाजीनगर (Shivajinagar) – 7.8, पाषाण (Pashan) – 10.1, लोहगाव (Lohgaon) – 3.2, चिंचवड (Chinchwad) – 8.5, लवळे – 13.5, मगरपट्टा – 6

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :-  Pune Rain | Finally rain came! Rains begin in Khadakwasla dam area

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्याच ट्विटची सर्वत्र चर्चा; म्हणाल्या…

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

 

Related Posts