IMPIMP

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्याच ट्विटची सर्वत्र चर्चा; म्हणाल्या…

by nagesh
Amruta Fadnavis | dcm devendra fadnavis wife amruta slams trollers say she only fears her mother in law

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Amruta Fadnavis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांनाच चकित केले. त्यानुसार शिंदे हे मुख्यमंत्री होणार असे जाहीर झाले. मात्र आपण या मंत्रीमंडळात नसणार असे फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले. मात्र त्यानंतर दोन तासात भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चक्रे फिरली अन उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचे अनेकांनी अभिनंदन केले. त्यामध्ये फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलेले ट्विट विशेष ठरले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे फडणवीस नाराज झाले असल्याची चर्चा सुरू झाली. दोन तासांच्या आत चक्र फिरली आणि शपथविधीआधी भाजपाच्या केंद्रीय पक्षनेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्यास सांगितले. भाजपच्या वरच्या फळीतील नेते अमित शहा (Amit Shah) आणि जे पी नड्डा (JP Nadda) हेच नाही तर अनेक नेत्यांनी या निर्णयाला फडणवीस यांचा त्याग असे म्हंटले. या सर्व घडामोडीनंतर फडणवीसांनीही शपथ घेतली. त्यानंतर अनेकांनी विविध पद्धतीने या दोघांचे अभिनंदन केले. मात्र यामध्ये अमृता फडणवीस यांनी केलेलं अभिनंदन हे चर्चेचा विषय ठरत आहे. कारणही तसंच आहे.

 

 

 

ट्विटच्या माध्यमातून अमृता फडणवीस या नेहमी भावनांना वाट मोकळी करून देत असतात. पण हे ट्वीट अतिशय सरळ-साधे व अत्यंत औपचारिक असल्याप्रमाणे दिसून आले. ‘आपले (महाराष्ट्राचे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा’, असे औपचारिक ट्विट करून अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी दोघांचे अभिनंदन केले.

 

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विट नंतर आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही असे संकेत अप्रत्यक्षपणे दिले का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
कारण राजकारणावर अमृता या नेहमीच भाष्य करता असतात.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्या सातत्याने टीका करत होत्या. एकनाथ शिंदे यांचे बंड सुरू केल्यानंतर ही त्यांनी सरकारवर टीका केली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नसल्याचे अमृता यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते अशी चर्चा सुरू झाली आहे.
कारण काही कामानिमित्त अमृता या देशाबाहेर गेल्या होत्या.
राज्यात सत्तांतर होणार आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव असतानाही त्या देशात आल्या नाहीत.
एकूणच फडणवीस हे जर मुख्यमंत्री होणार असते तर त्या लगबगीने भारतात आल्या असत्या. पण त्या आल्या नाहीत.
त्यामुळे यातून अमृता यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

 

Web Title :- Amruta Fadnavis | amruta fadnavis reaction on eknath shinde cm devendra fadnavis deputy cm oath taking see tweet

 

हे देखील वाचा :

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीस आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’ – एकनाथ खडसे

Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणार्‍या वाहनचालकांसाठी खूशखबर ! रजपूत वसाहतीतील रस्त्याचे रुंदीकरण होणार; वसाहतीतील 33 घरांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

 

Related Posts