IMPIMP

Sidhu Moosewala Murder Case | पंजाब पोलिसांनी एन्काउंटर केलेल्या शार्प शूटरची माहिती संतोष जाधवला होती, पुणे ग्रामीण पोलिसांची माहिती

by nagesh
Sidhu Moosewala Murder Case | santosh jadhav was aware of that sharp shooter in moosewala massacre pune rural police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sidhu Moosewala Murder Case | पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला हत्याकांडातील दोन शार्प शूटरांचा पंजाब
पोलिसांनी (Punjab Police) एन्काउंटर (Encounter) केला. पोलिसांनी अटारी सीमेवर दोघांचा खात्मा केला. या दोन शार्प शूटरांची (Sharp
Shooter) माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) अटक (Arrest) केलेल्या संतोष जाधवला (Santosh Jadhav) होती. त्याच्याकडे
केलेल्या चौकशीत त्याने याची माहिती सांगितली होती, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी (Sidhu Moosewala Murder Case) सांगितले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अटारी सीमेवर पंजाब पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत बुधवारी जगरुप उर्फ रुपा (Jagarup alias Rupa) आणि नमप्रीत उर्फ मन्नू (Nampreet alias Mannu) हे ठार झाले. मन्नू यानेच सिद्धु मुसेवाला याच्यावर AK 47 मधून गोळ्या घातल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले होते. मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर 52 दिवस ते फरार होते. पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव आणि महाकाल (Mahakal) यांची नावे शार्प शूटर म्हणून पंजाब पोलिसांनी जाहीर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

 

पुणे ग्रामीण पोलिसांनी महाकाल याला पुणे जिल्ह्याच्या सीमेवर तर संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली होती. त्यांच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस, पंजाब पोलीस यांनी कसून चौकशी केली होती. संतोष जाधव याच्यावर मंचर येथील खून तसेच नारायणगाव येथील खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहे. याशिवाय मंचर येथे खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल आहे. त्यात सध्या तो मंचर पोलिसांच्या (Manchar Police) ताब्यात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

संतोष जाधव याच्याकडे 4 ते 5 दिवस पंजाब पोलिसांनी कसून चौकशी केली होती. चौकशीमध्ये त्याने मन्नू याला ओळखत असल्याचे सांगितले होते.
मुसेवाला हत्याकांडात (Sidhu Moosewala Murder Case) एकूण 8 शार्प शूटरचा वापर करण्यात आला होता.
यातील प्रत्येकाला तीन लाख रुपये मिळाले होते. संतोष जाधव याला ज्याने आश्रय दिला होता.
त्याच्या सांगण्यावरुन संतोषला पैसे मिळाल्याचे उघड झाले होते.
पंजाब पोलिसांनी जाधव याच्याकडे मुसेवाला हत्याकांडाची चौकशी केल्याने पुणे पोलिसांनी या
प्रकरणात अधिक चौकशी केली नाही. परंतु त्याने मन्नू विषयी माहिती दिली होती.
तसेच इतर शार्प शूटरचीही त्याला माहिती होती, असे तपासात पुढे आले आहे.

 

Web Title :- Sidhu Moosewala Murder Case | santosh jadhav was aware of that sharp shooter in moosewala massacre pune rural police

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | सांगलीचा ‘पुष्पा’; चक्क पोलिस मुख्यालयातून चंदन चोरणाऱ्या दोघांना अटक

Chandrakant Patil | शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत; चंद्रकांत पाटलांचे पुणे महापालिका आयुक्तांना पत्र

Maharashtra Rains Update | राज्यात काही भागात ‘धो-धो’ पाऊस; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत, पावसामुळे शेती पिकांचेही नुकसान

Pune PMC News | डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमधील रस्त्यांवर अन्य कामांच्या खोदाईमुळे ‘खड्डे’ ! रिइंन्स्टमेंटचे काम करणार्‍या ठेकेदारांवर महापालिका कारवाई करणार

Pune PMC Election 2022 | ओबीसी आरक्षणामुळे पुणे महापालिका निवडणुकीत होणार मोठे फेरबदल ! ओबीसी व महिला आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार; त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच निवडणूक सप्टेंबरमध्ये?

 

Related Posts