IMPIMP

इंग्लंडच्या ‘या’ जलदगती गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

by bali123
former england bowler joey benjamin dies aged

सरकारसत्ता ऑनलाइन – १९९०च्या दशकात इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे माजी जलदगती गोलंदाज जोए बेंजामिन joey benjamin यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. यामुळे इंग्लंड क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. ही घटना मंगळवारी घडली. ते ६० वर्षांचे होते. जोए बेंजामिन यांनी ३३ व्या वर्षी १९९४साली इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्यांनी वन डे क्रिकेटमध्येसुद्धा पदार्पण केले. क्रिकेटमध्ये त्यांनी बरीच वर्षे गाजवली होती. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप कमी होती. त्यांनी सरे क्रिकेट क्लबकडून दमदार कामगिरी केली होती.

जोए बेंजामिन यांच्याविषयी
जोए बेंजामिन joey benjamin यांचा जन्म कॅरेबियन बेट सेंट किट्स येथे १९६१ साली झाला होता. त्यानंतर ते १५ वर्षांचे असताना ते आपल्या कुटुंबाबरोबर ब्रिटेनमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी वॉर्विकशर कौंटीतून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिला प्रथम श्रेणी सामना त्यांनी वयाच्या २७व्या वर्षी खेळला. १९८८ साली त्यांनी वॉर्विकशरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये सरे क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रथम श्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्ये मिळून ५६० विकेट्स घेतल्या आहेत.

सुनील गावस्कर यांच्यानंतर ‘हा’ कसोटीतील भारताचा सर्वोत्तम सलामीवीर

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Posts