IMPIMP

ACB Trap News | दीड लाखाची मागणी करून 50 हजाराची लाच घेणार्‍या महिला नायब तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Thane Bhiwandi Naib Tahsildar Sindhu Umesh Khade who demanded 1.5 lakh and took a bribe of 50 thousand is in the net of anti-corruption

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून 50 हजार रूपयाची लाच घेणार्‍या भिवंडी तहसील कार्यालयातील (Bhiwandi Tehsil Office) नायब तहसीलदार सिंधू उमेश खाडे (Naib Tahsildar Sindhu Umesh Khade) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau Thane) रंगेहाथ पकडले आहे. अ‍ॅन्टी करप्शनने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap News)

सिंधू उमेश खाडे Sindhu Umesh Khade (52, पद – नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, भिवंडी, जि. ठाणे) यांनी 50 हजाराची लाच घेतली आहे (Thane Bribe Case). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे व्यवसायाने वकिल असून त्यांच्या अशिलाचे फेरफार हरकत प्रकरणाच्या अंतिम निर्णयाची प्रत देण्यासाठी सिंधू खाडे यांनी 1 लाख 50 हजार रूपयाची लाच मागितली होती (Thane ACB Trap). तडजोडीअंती 50 हजार रूपयाची लाच घेण्याचे त्यांनी मान्य केले होते.

तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, सरकारी पंचासमक्ष नायब तहसीलदार सिंधू उमेख खाडे यांनी 50 हजार रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Bhiwandi ACB Trap)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे (PI Suresh Chopde), पोलिस हवालदार नरेंद्र भावसार, पोलिस हवालदार संदेश शिंदे,
पोलिस सचिन मोरे, महिला पोलिस अश्विनी राजपुत आणि चालक पोलिस हवालदार चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : ACB Trap News | Thane Bhiwandi Naib Tahsildar Sindhu Umesh Khade who
demanded 1.5 lakh and took a bribe of 50 thousand is in the net of anti-corruption

Related Posts