IMPIMP

ACB Demand Case | 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

by nagesh
ACB Demand Case | Anti-corruption case filed against police sub-inspector Ramchandra Dattatraya Shendge for demanding Rs 1 lakh bribe

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Demand Case | अटकपुर्व जामीन (Anticipatory Bail) मिळण्याकरिता मदत करण्यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणार्‍या मिरा-भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या (Mira Bhayandar Vasai Virar Police Commissionerate) अख्यारित असलेल्या तुळींज पोलिस स्टेशनमधील (Tulinj Police Station) पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द Police Sub Inspector (PSI) लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्या (Anti Corruption Bureau Maharashtra) पथकाने गुन्हा दाखल केला आहे. (ACB Demand Case)

पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र दत्तात्रय शेंडगे Police Sub-Inspector Ramchandra Dattatraya Shendge (36) असे लाचेची मागणी करणार्‍या पीएसआयचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरूध्द तुळींज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात तक्रारदारास अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी मदत करण्याकरिता पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र दत्तात्रय शेंडगे यांनी दि. 27 मार्च 2023 रोजी 1 लाख रूपयाची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली. (ACB Demand Case)

प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये पीएसआय रामचंद्र शेंडगे (PSI Ramchandra Shendge) यांनी 1 लाख रूपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरूध्द लाचेची मागणी (Thane ACB Trap) केल्याप्रकरणी गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (Thane ACB SP Sunil Lokhande),
अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उप अधीक्षक माधवी राजेकुंभार (DySP Madhavi Rajekumbhar), पोलिस हवालदार खान,
पोलिस हवालदार गायकवाड आणि महिला पोलिस हवालदार तेटाबे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Join Our

SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update


Web Title :
ACB Demand Case | Anti-corruption case filed against police sub-inspector Ramchandra Dattatraya Shendge for demanding Rs 1 lakh bribe

हे देखील वाचा

Related Posts