IMPIMP

EPFO | ऑनलाइन अशा प्रकारे फाइल करा EPF नॉमिनी डिटेल; फॉलो करा ‘ही’ स्टेप बाय स्टेप प्रोसेस

by nagesh
EPFO | online fraud prevention tips in pf account epfo told its account holders to prevent cyber fraud by these easy tips
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | EPF नियंत्रित करणारी संस्था EPFO आपल्या गुंतवणुकदारांना वेबसाइटद्वारे अकाऊंट नॉमिनेशनची माहिती ऑनलाइन जमा करण्याची सुविधा देते. EPF मेंबरचा मृत्यू किंवा इतर आकस्मिक घटनेत अडचणी टाळण्यासाठी अकाऊंटचा नॉमीनी नोंदवणे आवश्यक असते.

Provident Fund (PF), पेन्शन (EPS) आणि इन्श्युरन्स (EDLI) सेवांचा ऑनलाइन लाभ घेण्यासाठी आपला e-nomination फाइल करणे अतिशय आवश्यक आहे.

अशी आहे स्टेप बाय स्टेप प्रॉसेस

– प्रथम EPFO ची वेबसाइट www.epfindia.gov.in वर व्हिजीट करा.

– तुमचा UAN No. आणि पासवर्ड नोंदवून लॉगइन करा.

– नंतर मॅनेज टॅबवर क्लिक करून ई-नॉमिनेशन ऑपशन निवडा.

– आता नवीन पेज ओपन होईल, तिथे मेंबरची पूर्ण माहिती जसे की, नाव, UAN, जन्म तारीख दिसेल.

– नंतर मुळ आणि सध्याचा पत्ता नोंदवून सेव्ह ऑपशनवर क्लिक करा.

– आता कौटुंबिक घोषणा अपडेट करण्यासाठी YES च्या पर्यायावर क्लिक करून अ‍ॅड फॅमिली ऑपशनवर जा.

– तिथे नॉमिनीचे नाव, नाते, पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर नोंदवा.

– नंतर नॉमिनेशन डिटेल्सवर जाऊन हे ठरवू शकता की कोणत्या नॉमिनीला EPF चा किती भाग दिला जावा.

– नंतर सेव्ह नॉमिनेशन ऑपशनवर क्लिक करा.

– यानंतर OTP जनरेट करावा लागेल, ज्यासाठी ई-साइन टॅबवर क्लिक करा.

– यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.

– आलेला ओटीपी भरताच ई-नॉमिनेशन EPFO सोबत रजिस्टर होईल.

Web Titel :-  EPFO | file epf nominee details with this online process follow this step by step process

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा 

Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून कोटयावधीचं सोनं चोरणार्‍या 2 महिला अन् लहान मुलगा CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडीओ

Social Media Posts | सोशल मीडियावरून मिळू शकते घसघशीत पगाराची नोकरी, फक्त पोस्टमध्ये करू नका ‘या’ 5 चूका; जाणून घ्या

Related Posts