IMPIMP

Pune Hadapsar Crime | पुणे : दुचाकी आडवी लावल्याच्या कारणावरुन तरुणाला दगड, सिमेंट ब्लॉकने मारहाण

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | रस्त्यात गाडी आडवी लावल्याचा जाब विचारला असता तीन जणांनी एका तरुणाला दगड, सिमेंट ब्लॉकने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार 9 माच रोजी दुपारी दोनच्या सुमारास हडपसर भागातील गाडीतळ (Gadital Hadapsar) येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (वय-29 रा. सिद्धीविहार, गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश मुकुंद गायकवाड (वय-35 रा. आदित्यनगर, हडपसर), अजिंक्य उंद्रे (वय-25 रा. मांजरी बुद्रुक, पुणे), व एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 325, 341, 352, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी गौरव म्हेत्रे त्यांच्या चारचाकी मधून घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी रस्त्यामध्ये दुचाकी आडवली लावल्याने याचा जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी गौरव याला दगडाने मारुन शिवीगाळ केली. तसेच रस्त्याच्या बाजुला पडल पडलेले सिमेंट ब्लॉक हाताच्या अंगठ्यावर मारुन अंगठ्याचे हाड फ्रॅक्चर करुन जखमी केले. तसेच चारचाकी गाडीवर दगड मारुन नुकसान केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुलाणी करीत आहेत.

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

Related Posts