IMPIMP

Pune ACB Trap | पुणे : लाच मागणाऱ्या थेऊरच्या महिला मंडल अधिकाऱ्यासह तीन जण अ‍ॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune ACB Trap | शेतजमीनीच्या सातबारा उताऱ्यावरुन कमी झालेल्या नावाची नोंद पुर्न:स्थापीत करण्यासाठी सात हजार रुपये लाचेची मागणी थेऊर मंडल अधिकारी यांनी केली. लाच स्वीकारताना दोन खासगी व्यक्तींना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.12) थेऊर मंडल अधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आली. (Pune Bribe Case)

मंडल अधिकारी जयश्री कवडे, खासगी संगण ऑपरेटर योगेश कांताराम तातळे (रा. दिघी), एजंट विजय सुदाम नाईकनवरे (वय-38 रा. नागपुर चाळ, येरवडा) यांच्यावर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणाने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडीलांची मौजे कोलवडी येथे शेतजमीन आहे. या शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावरील त्यांचे नाव कमी झाल्याने त्या नावाची नोंद पुर्न:स्थापीत करण्यासाठी तक्रारदार यांच्या आजी व तिच्या बहिणीने हवेली तहसिलदार कार्यालयाकडे अर्ज केला होता. या अर्जावर तहिसलदार यांनी तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडीलांची 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी गाव कामगार तलाठी कोलवडी व मंडल अधिकारी थेऊर यांना आदेश दिले होते.

गावकामगार तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदीप्रमाणे ती नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी मंडल अधिकारी जयश्री कवडे यांची भेट घेतली. त्यावेळी कडवे यांनी खासगी इसम विजय नाईकनवरे याला भेटण्यास सांगितले. नाईकनवरे याने तक्रारदार यांच्याकडे फेरफार नोंदीप्रमाणे आजीच्या आईच्या वडीलांची नोंद मंजुर करण्यासाठी जयश्री कवडे यांच्याकरीता दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, मंडल अधिकारी कार्यालयातील खासगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांच्याकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच तडजोडी अंती सात हजार रुपये लाचेची मागणी केली. याला संगणक ऑपरेटर योगेश तातळे याने दुजोरा दिला. जयश्री कवडे यांनी तातळे व नाईकनवरे यांना लाच मागणीला व लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपये लाच स्वीकारताना नाईकनवरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली.

शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे-मोदी हजार टक्के एकत्र येणार, राऊतांचे पीएमओला आवाहन

Related Posts