IMPIMP

Pune Sinhagad Road Murder Case | जुन्या भांडणाच्या रागातून डोक्यात वीट मारुन मजुराचा खून, सिंहगड रस्ता परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Sinhagad Road Murder Case | जुन्या भांडणातून बांधकाम मजुराच्या डोक्यात सिफोरेक्स ब्रिक्स ही वीट मारुन खून केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. ही घटना नांदेड सिटीच्या अलिकडे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी (दि.12) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. आरोपी बांधकाम मजुर असून घटनेनंतर तो पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पिंटु गौतम दास (वय 28, सध्या रा. बांधकामाच्या ठिकाणी, मूळ -हिल्ली जि. दक्षिण दिनाजपुर, पश्चिम बंगाल ) असे खून झालेल्याचे नाव आहे. पिंटू याचा भाऊ छोटु गौतम दास (वय-23, धंदा-मजुरी, सध्या रा. वानवडी) याने याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून एजाज उल महंमद हसिब आलम (मूळगाव बिहार) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन रविवारी वाद झाले होते. याच रागातून आरोपीने चंद्रकांत देडगे यांच्या बिल्डींग बांधकामावरील कामावर असताना 5 व्या मजल्यावर पिंटू याच्या डोक्यात वीटांनी घाव घातले.‌ यात पिंटू हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

 ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार ! ‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत

Related Posts