IMPIMP

Pune Katraj-Kondhwa Road Crime | पुणे : ‘काम सोड नायतर…’ अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज करुन धमकी

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Katraj-Kondhwa Road Crime | अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करुन विनयभंग केला (Molestation Case) . तसेच ‘होईल तेवढ्या लवकर काम सोड नायतर सुरा तुझ्या गालावर फिरवतो’ अशी धमकी मुलीला दिली. या प्रकरणी अज्ञात मोबाइल धारकावर भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 29 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे आठ व सोमवारी (दि.11) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवर पीडित मुलीच्या घरात घडला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 38 वर्षीय आईने मंगळवारी (दि.12) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनोळखी मोबाइल धारकावर आयपीसी 354(ड)(2), 507, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन मेसेज आला. यामध्ये अश्लील बोलून मुलीला काम सोडण्यास सांगितले. तसेच काम सोडले नाहीतर चाकूने वार करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या मुलीने आरोपीला रिप्लाय केला असता, त्याने पुन्हा अश्लील मेसेज करुन धमकी देऊन मुलीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.

समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकी आणि शास्तीकर वसुलीला स्थगिती; लोकसभेच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यकर्ते झोपेतून जागे झाले?

Related Posts