IMPIMP

Pradhan Mantri Kusum Yojana | ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शेतकऱ्यांसाठी महत्वाची; जाणून घ्या

by nagesh
Pradhan Mantri Kusum Yojana | pradhan mantri kusum yojana launched important scheme for farmers

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Pradhan Mantri Kusum Yojana | शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी आणि शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी केंद्र सरकारकडून अनेक विविध योजना आणल्या जात आहेत. यामध्येच कुसुम सोलर पंप योजना (Pradhan Mantri Kusum Yojana) ही आणली आहे. शेतकऱ्याने फक्त निसर्गावर अवलंबून राहू नये. निसर्गाचा लहरीपणा, वीजेची असणारी कमतरता तसेच सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणं उपलब्ध होत नाही. अनेक अडचणीॆना सामोरे जावे लागते. या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आता कुसुम योजना आणली आहे.

 

सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचावी हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. कुसुम सोलर पंप योजना (Pradhan Mantri Kusum Yojana) 2021 ला सुरु झाली. जरम्यान, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात कुसुम योजनेची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला नाही. मात्र आता अनेक शेतकरऱ्यांना लाभ मिळावा यासाठी नेमकी योजना कशी आहे. याबाबत जाणून घ्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या योजनेसाठी निकष काय?
– ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार हे पात्र असणार आहेत.

– बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत शेतामध्ये असणे आवश्यक आहे.

– ज्या शेतकऱ्यांची शेती ही दुर्गम भागात आहे. ज्या ठिकाणी वीज कनेक्शन हे उपलब्ध नाही असे शेतकरी.

– शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीनुसार हे सौर पंप मिळणार आहेत. 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP DC,5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP DC,5 एकर पेक्षा अधिक असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

 

वैशिष्ट्य काय?

– महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात पारेषण विरहित 3814 कृषी पंपाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना पाणी देता येणार आहे. शिवाय शेतकऱ्यास स्व-खर्चाने अन्य उपकरनेही त्याला जोडता येणार आहेत.

– सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी कृषिपंप किंमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा हा लाभार्थी राहणार आहे.

– शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.

 

पात्रता काय?
– अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.

– सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.

– अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता च्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.

– सदर योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.

 

आवश्यक कागदपत्रे –
– आधार कार्ड
– पासपोर्ट साईझ फोटो
– रेशन कार्ड
– नोंदणी प्रत
– प्राधिकरण पत्र
– जमीन प्रत
– चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र
– मोबाइल नंबर
– बँक खाते विवरण

अर्जाबाबत माहिती –
ही योजना 14 सप्टेंबर 2021 पासून सुरुवात झाली आहे. https://www.mahaurja.com/meda/en/node या लिंकवर क्लिक करुन इच्छुकास अर्ज करता येणार आहे.

 

Web Title : Pradhan Mantri Kusum Yojana | pradhan mantri kusum yojana launched important scheme for farmers

 

हे देखील वाचा :

Chandrapur Crime | अधिकाऱ्यांच्या बोगस सहीने नोकरीचे नियुक्तीपत्र, 22 बेरोजगारांची 1 कोटींची फसवणूक

Pune News | ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘हल्ला बोल’ ! कैट महाराष्ट्र व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आंदोलन

Crime News | तेलंगणामध्ये चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला

 

Related Posts