IMPIMP

Pune Police | ‘खऱ्या हिरोंना माझा मानाचा मुजरा’ ! पुण्यातील खाकी वर्दीतील ‘रिअल स्टोरी’ अभिनेत्रीनं केली शेअर

by nagesh
Pune Police | pune city police real hero actress nityashree dnyanlaxmi Nangre Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Police | पुण्यातील एका खाकी वर्दीतील ‘रिअल हिरोंची स्टोरी’ समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री 1 वाजता
बालगंधर्व नाट्यगृह (Balgandharva Natyagruha) समोर एक तरुणी अभिनेत्री रिक्षा, ओला कैबची वाट बघत होती. पण तेथे कोणतंही वाहन आलं
नाही. त्यानंतर तरुणी घाबरली. तितक्यात रिअल हिरोंची एंट्री झाली. अर्थात त्या ठिकाणी पोलिस अधिकारी (Police officer) दाखल झाले. तरुणीची
विचारपुस करुन आपल्या पोलिसांच्या कारमध्ये बसवून पुढे रिक्षातून घरी सुरक्षितपणे सोडले. यानंतर पुणे पोलिसांच्या (Pune Police) कर्तव्याची चर्चा
पसरली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शनिवारी रात्री बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) यांची प्रमुख भुमिका असलेला “मोरूची मावशी’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. हा प्रयोग रात्री ठीक 12 वाजता संपला. याच नाटकात अभिनेत्री नित्याश्री ज्ञानलक्ष्मी नागरे पाटील (Nityashree Dyanlakshmi Nangre Patil) या भरत जाधव यांच्या “संध्या” नावाच्या प्रेयसीचीही भूमिका साकारत आहेत. या नाटकाच्या प्रयोगानंतर सर्व कलाकार जेवून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पुण्यातच नाटकाचा प्रयोग असल्याने बाकी सर्व कलाकार हॉटेलमध्ये थांबणार होते. दरम्यान, नित्याश्री कर्वेनगर (Karvenagar) येथील असल्याने गडबडीत जेवण उरकून घरी जायचे ठरविले. तरी देखील तेथून निघेपर्यंत रात्री 1 वाजला. (Pune Police)

बालगंधर्व वरून कर्वेनगर दूर नसल्याने त्यांना तशी भीती वाटत नव्हती. म्हणून त्यांनी ओला कैब बुक केली, पण तिही रद्द झाली. त्यानंतर त्या रिक्षाची वाट पाहत थांबल्या. पण रिक्षा देखील मिळाली नाही. दरम्यान, तितक्यात “त्या” रात्रीच्या सामसूम रस्त्यावरून अनपेक्षितपणे खऱ्या “हिरो”ची “एन्ट्री” झाली. रस्त्यावर थांबलेली तरुणी बघून पोलिसांची कार तिच्यासमोर येऊन थांबली. गाडीत रात्रगस्तीवर असणारे डेक्कन पोलीस ठाण्याचे (Deccan Police Station) पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (Police Inspector (Crime) Sanjay Mogle) आणि त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारी शरद गोरे (Sharad Gore) व रामदास गद्रे (Ramdas Gadre) होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांनी गाडीतून खाली उतरून नित्याश्री यांची आस्थेने चौकशी केली. त्यांची अडचण लक्षात घेऊन तत्काळ त्यांच्यासाठी रिक्षा पाहू लागले. अखेर वाट बघून मोगले यांनी नित्याश्री यांना त्यांच्या गाडीत बसण्याची विनंती केली. त्यानंतर त्या गाडीत बसल्या. काही अंतरावर पोलिसांना रिक्षा दिसली. पोलिसांनी रिक्षाचालकाला जवळ बोलावून त्यांना सुव्यवस्थित स्थळी पोहोचवण्यास सांगितले. विशेष म्हणजे पोलिसांनी रिक्षावाल्याची संपुर्ण माहिती घेतली. त्यानंतर नित्याश्री यांनी क्षणार्धात पोलिसांसोबत सेल्फी घेत त्यांच्या कार्य आणि कर्तुत्वाला सलाम दिला. काही वेळात नित्याश्री सुखरूप घरी पोहचल्या. दरम्यान, अभिनेत्री नित्याश्री यांनी हा जिंवत अनुभव फेसबुकवर (Facebook) मांडल्यानंतर पोलिसांचे कौतुक करण्यात आले.

 

 

‘आम्ही रात्रीच्या वेळी महिला, वृद्ध व अडचणीमध्ये सापडलेल्या नागरीकांना कायम मदत करतो, त्यानुसार, नित्याश्री यांनाही मदत केली. त्या अभिनेत्री असल्याचे आम्हाला त्यांच्याकडून समजले. त्यांनी आमच्यासोबत सेल्फी घेतली, तसेच, आमचे कौतुक केले. आम्ही कायम टिकेचे धनी ठरत असतो, त्यात अशी कौतुकाची थाप काम करण्यास उभारी देते.” असं पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (Police Inspector (Crime) Sanjay Mogle) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“खरंच सणवार,घरातील सुखदुःखाचे प्रसंग,अगदी कुटुंबपणाला लावून जे अहोरात्र केवळ आपल्या सेवेसाठी तत्पर असतात, त्या खऱ्या हिरोंना माझा मानाचा मुजरा. पोलिसांचे करावे तितके कौतुक कमी आहे. मी मुळची मुंबईची आहे व पुण्यातही राहते. मला आलेला अनुभव खुप छान होता. कलाकारापेक्षा माणुस म्हणून मला आलेला अनुभव कमाल होता. त्यामुळेच मी पोलिस अधिकारी संजय मोगले यांना पुन्हा फोन करुन आभार मानले आणि त्यांचे कौतुक ही केले. असं नित्याश्री ज्ञानलक्ष्मी नागरे पाटील यांनी म्हटलं.

 

 

web title : Pune Police | pune city police real hero actress nityashree dnyanlaxmi Nangre Patil

 

हे देखील वाचा :

Bad Breath Problem | तोंडाच्या दुर्गंधीपासून करायचा असेल बचाव तर ‘या’ गोष्टींपासून राहा दूर, असा मिळवा श्वासाचा ताजेपणा

Pune Crime | धक्कादायक ! शारीरिक संबंध ठेवत नसल्याच्या रागातून कर्वे रोडवरील हॉस्टेलवर जाऊन तरुणीला बेदम मारहाण, विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध FIR

IPS Saurabh Tripathi | निलंबित IPS अधिकारी सौरभ त्रिपाठीला न्यायालयाचा दणका; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts