IMPIMP

IND vs NZ 3rd T20 | सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन वैद्यकीय कारणामुळे बाहेर

by nagesh
IND vs NZ 3rd T20 | ind vs nz t20 series kane willamson out of third t20 match against india

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – IND vs NZ 3rd T20 | सध्या भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात तीन सामन्यांची टी-20 (T-20 Series) मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा सामना 22 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याअगोदर न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय कारणामुळे कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) तिसऱ्या टी-20 मधून बाहेर झाला आहे. (IND vs NZ 3rd T20)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अगोदरच वैद्यकीय अपॉइंटमेंट घेतली असल्यामुळे विल्यमसन तिसऱ्या टी-20 सामन्याला मुकणार आहे. त्याच्या जागी वरिष्ठ वेगवान गोलंदाज टीम साऊथी (Tim Southee) न्यूझीलंडचे कर्णधारपद सांभाळणार आहे. केन विल्यमसन बाहेर पडल्यामुळे डावखुरा स्फोटक फलंदाज मार्क चॅपमन (Mark Chapman) संघात परतला आहे. तिसऱ्या सामन्यात केन विल्यमसनच्या जागी त्याला संधी मिळू शकते. केन विल्यमसन बाहेर पडल्यामुळे न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

टी-20 मालिकेनंतर न्यूझीलंड संघ भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे.
या वनडे मालिकेच्या अगोदर केन विल्यमसन संघात माघारी परतु शकतो.
पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी ऑकलंडमध्ये (Auckland) होणार आहे.
या मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
त्याचबरोबर युवा खेळाडूंना सोबत घेऊन टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- IND vs NZ 3rd T20 | ind vs nz t20 series kane willamson out of third t20 match against india

 

हे देखील वाचा :

Jason David Frank | पॉवर रेंजर फेम अभिनेत्याचं निधन; मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट

Hengameh Ghaziani | हिजाबशिवाय व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर प्रसिद्ध इराणी अभिनेत्रीला अटक, व्हिडीओ व्हायरल

Nitesh Rane | ‘सावरकरांवर टिका करणाऱ्यांवर यांची खरी निष्ठा…” नितेश राणेंकडून संजय राऊतांच्या ट्विटला प्रतिक्रिया देत शिवसेनेवर पलटवार

 

Related Posts