IMPIMP

Nawab Malik | रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती का?

by nagesh
IPS Officer Rashmi Shukla | rashmi shukla does not have a clean chit the court rejected the closer report in the phone tapping case

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online): Nawab Malik | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांनी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन टॅपिंग (Phone tapping ) करण्यात आल्याचं शुक्ला यांनी म्हटलं आहे. आपल्याला बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोप देखील शुक्ला यांनी केलाय. यावरून राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सवाल उपस्थित केले आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केलीय. रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप (Phone tapping ) केले होते. तर तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असं नवाब मलिक यांनी प्रश्न केला आहे. त्यावेळी नवाब मलिक म्हणाले, ‘नेत्यांचे फोन टॅप (Phone tapping ) करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या असे ते म्हणाले. रश्मी शुक्लांच्या वकीलांनी न्यायालयात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे म्हटले आहे, परंतु, फोन टॅपिंगसाठी दिशाभूल करुन परवानगी घेण्यात आली असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.

 

 

पुढे बोलताना नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, ‘पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना त्या
काळातील खासदार, नेते यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे.
ज्यापध्दतीने त्या त्यांची बदली झालेली सांगत आहेत, परंतु त्यांची बदली झालेली नाही असं मलिक
यांनी म्हटलं आहे. या दरम्यान, ‘फोन टॅपिंग’साठी (Phone tapping ) शुक्ला यांनी तत्कालिन
अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची परवानगी घेतली होती. याबाबत सादर केलेल्या अहवालाची तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव कुंटे यांनी दखल घेतली होती. त्याचप्रमाणे त्यांनी शासनाला दिलेल्या रिपोर्टमध्ये परवानगीविषयी नमूद केले होते. यांनंतर मात्र त्यांनी या प्रकरणी दिशाभूल केली, असा दावा रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांच्यातर्फे न्यायालयात करण्यात आला आहे.

 

 

 

Web Title : Nawab Malik | rashmi shukla get permission from the cm for phone tapping question by nawab malik

 

हे देखील वाचा :

Pune Crime | डायस प्लॉटमध्ये माझे ‘राज’ चालणार म्हणणार्‍या ‘जीएसटी’ गँगच्या प्रमुखाला अटक; तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Maharashtra Unlock | राज्य अनलॉक होणार? टास्क फोर्ससोबत CM ची बैठक, डॉक्टरांनी मांडलं ‘हे’ मत, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

MP Sanjay Raut | UP मध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत ‘शिवसेना’ स्वबळावर लढणार

 

Related Posts