IMPIMP

WhatsApp Chatting Face Lock | तुमचा चेहरा वाचून उघडेल WhatsApp चे चॅट, आता विना टेन्शन कुणालाही द्या फोन

by nagesh
WhatsApp Chatting Face Lock | whatsapp chats will open after your face recognition now give phone to anyone without tension

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–   WhatsApp Chatting Face Lock | व्हॉट्सअ‍ॅप ने पुन्हा एकदा आपल्या कोट्यवधी यूजर्सला सरप्राईज दिले आहे. कंपनीने एका अशा फीचरवर काम केले आहे ज्याची आज प्रत्येक व्यक्तीला आवश्यकता आहे. हे फीचर प्रायव्हसीच्या संबंधीत आहे. तुमचे पर्सनल व्हॉट्सअप चॅटिंग फेस लॉक (WhatsApp Chatting Face Lock) च्या मदतीने सुरक्षित करता येईल. म्हणजे आता तुमचे व्हॉट्सअप चॅट केवळ तुमच्या चेहर्‍याने उघडेल. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अनेकदा अशी स्थिती येते की, जेव्हा आपल्याला आपला स्मार्टफोन एखादा मित्र किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला द्यावा लागतो.
अशावेळी टेन्शन वाढते जेव्हा समोरील व्यक्ती पर्सनल व्हॉट्सअप चॅट उघडून वाचू लागतो.

तुमच्या बाबतीत सुद्धा नेहमी असे घडत असेल तर ही व्हॉट्सअ‍ॅप ट्रिक तुमच्या खुप उपयोगी येईल.
कुणीही तुमचे चॅट वाचू शकणार नाही. व्हॉट्सअपच्या या ट्रिकचा फायदा केवळ आयफोन यूजर्सच घेऊ शकतात.
व्हॉट्सअपचे आयओएस 9 आणि त्यानंतरची सर्व व्हर्जन एका अ‍ॅडिशनल सिक्युरिट फीचरसह येतात.
जी व्हॉट्सअप अनलॉक करण्यासाठी टच आयडी किंवा फेस आयडी अनेबल करण्याची परमिशन देतात. हे फीचर कसे अ‍ॅक्सेस करायचे ते जाणून घेवूयात…

सर्वप्रथम ’व्हॉट्सअप सेटिंग’वर जा. नंतर, ’अकाऊंट’वर टॅप करा. येथे ’प्रायव्हसी’चे ऑपशन दिसेल.
त्यावर क्लिक करा आणि ’स्क्रीन लॉक’वर टॅप करा.
आता, ’टच आयडी किंवा फेस आयडी’ ज्याची आवश्यकता असेल ते ऑन करा.
नंतर, टच आयडी किंवा फेस आयडी विचारण्यापूर्वी व्हॉट्सअप स्टँडबाय मोडवर असू शकते, त्याचा कालावधी निवडा.

जर तुमच्या फोनमध्ये टच किंवा फेस आयडी नसेल किंवा खराब आहे.
तर आपला आयफोन पासकोड सुद्धा नोंदवू शकता.

 

Web Title : WhatsApp Chatting Face Lock | whatsapp chats will open after your face recognition now give phone to anyone without tension

 

हे देखील वाचा :

LIC Jeevan Pragati Scheme | एलआयसी स्कीममध्ये दररोज 200 रुपयांची गुंतवणूक देईल 28 लाख रुपये, जाणून घ्या कसे

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीमध्ये 446 रूपयांची वाढ, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर

Pune Camp News | पुणे कॅम्प परिसरातील बसस्टॉपचे शेड कोसळले, 6 नागरिक जखमी

 

Related Posts