IMPIMP

LIC Jeevan Pragati Scheme | एलआयसी स्कीममध्ये दररोज 200 रुपयांची गुंतवणूक देईल 28 लाख रुपये, जाणून घ्या कसे

by nagesh
LIC Jeevan Labh Scheme | insurance get rs 54 lakh in 25 years with death benefit in lic jeevan labh scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Jeevan Pragati Scheme | एलआयसी जीवन प्रगती स्कीम (LIC Jeevan Pragati scheme) मध्ये गुंतवणुकदार रोज 200 रुपयांची गुंतवणूक (per day Rs 200 investment) करून 28 लाख रुपयांचा लाभ (benefit of Rs 28 lakh) घेऊ शकतात. एलआयसी जीवन प्रगती योजना गुंतवणुकदारांना डेथ रिस्क कव्हर देतेच शिवाय भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे इरडा (Insurance Regulatory and Development Authority of India (IRDA) च्या नियमांचे पालन सुद्धा करते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कसा जमा होईल 28 लाख रुपयांचा फंड :
या प्लॅन अंतर्गत 15 लाखाचा सम अश्युअर्ड आणि 200 रुपये रोजच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 20 वर्षानंतर सुमारे 28 लाख रुपयांचा फंड मिळेल. यामध्ये कमी किंवा जास्त होऊ शकतो. या पॉलिसीमध्ये तुम्ही जेवढा सम एश्युअर्ड घेता, त्यामध्ये वाढ होते आणि पॉलिसीच्या अखेरपर्यंत सम एश्युअर्ड जवळपास दुप्पट होते. ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे.

 

आणखी कोणते फायदे मिळतात :
हा एंडोमेंट प्लान आहे, जो एकाच वेळी सुरक्षा आणि बचत देतो. पॉलिसीत दर पाच वर्षात रिस्क कव्हर वाढते. पहिल्या पाच वर्ष सम इंश्युअर्ड तेवढाच राहतो. यानंतर 6 ते 10 वर्षापर्यंत तो 25% वाढून 125% होतो. 11 ते 15 वर्षासाठी सम इन्श्युअर्ड 150% होतो. 16 ते 20 वर्षासाठी सम इन्श्युअर्ड बेसिक सम इन्श्युअर्डच्या 200% होते.जर पॉलिसी कालावधीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला मृत्यूवर विमा रक्कम + सिम्पल रिव्हर्सनरी बोनस (जमा बोनस) + फायनल अ‍ॅडीशन बोनस (जर काही असेल तर) दिले जाते.

 

कोण घेऊ शकतात योजनेचा लाभ :

एलआयसी जीवन प्रगती पॉलिसीत गुंतवणूक 12 वर्षावरील कुणीही करू शकतात.
या योजनेसाठी कमाल वय 45 वर्ष आहे. तसेच, किमान 12 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
पॉलिसीधारक कमाल 20 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतो.

 

Web Title :- LIC Jeevan Pragati Scheme | know about lic jeevan pragati scheme premium maturity and benefits

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीमध्ये 446 रूपयांची वाढ, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर

Pune Camp News | पुणे कॅम्प परिसरातील बसस्टॉपचे शेड कोसळले, 6 नागरिक जखमी

Tata Motors | आकर्षक व्याजदरासह सर्व कारवर मिळणार 90 % फायनान्स, Tata Motors ने सुरू केली स्कीम

 

Related Posts