IMPIMP

SBI Alert | ‘या’ पैकी कोणताही नंबर करू नका शेयर, अन्यथा संकटात सापडाल, जाणून घ्या

by nagesh
SBI Alert Number | customers of sbi must remember this number in case of fraud you will get immediate help

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Alert | जर तुम्ही State Bank Of India (SBI Alert) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची सूचना आहे. एसबीआयने 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट मेसेज जारी केला आहे. एसबीआयने काही नंबर शेयर करण्यास मनाई केली आहे. बँकेने ट्विटरवर म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार फ्री गिफ्टच्या नावावर ग्राहकांना लिंक पाठवून त्यांच्या पर्सनल डिटेल चोरी करत आहेत.

हे नंबर करू नका शेयर
तुम्ही तुमची जन्म तारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिग यूजर आयडी आणि पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही आणि ओटीपी सारखे नंबर कुणासोबतही शेयर करू नये असे बँकेने म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

या गोष्टी लक्षात ठेवा
याशिवाय एसबीआय, आरबीआय, सरकार, ऑफिस, पोलीस आणि केवायसी अथॉरिटीच्या नावावर जे फोन कॉल येतात त्यांच्यापासून सावध रहा. याशिवाय फोनवर कुणाच्या सांगण्यावरून कोणतेही अ‍ॅप किंवा एखाद्या अनोळखी सोर्सद्वारे कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करू नका.

अनोळखी लोकांकडून पाठवण्यात आलेले मेल आणि मेसेजमध्ये कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या फेक ऑफर्स ज्या सोशल मीडिया किंवा मेसेज आणि फोनवर मिळत असतील तर त्यापासून सावध (SBI Alert) रहा.

कधीही करू नका ही चूक
बँकेने म्हटले आहे की, बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड, एटीएम कार्डचा नंबर किंवा त्याचा फोटो काढून ठेवल्यानेही माहिती लिक होण्याचा धोका असतो. यामुळे तुमचे अकाऊंट रिकामे होऊ शकते.

बँकेनुसार, ही गोष्ट लक्षात ठेवा की, पब्लिक इंटरनेटचा वापर पैशांच्या व्यवहारासाठी करूनका.
यामध्ये पर्सनल माहिती लिक होण्याचा धोका असतो.
मागील वर्षी लॉकडाऊन नंतर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
यासाठी बँक वेळोवेळी ग्राहकांना अलर्ट (SBI Alert) करत आहे.

Web Title :- SBI Alert | sbi alert customers do not share these numbers with anyone check marathi news sarkarsatta

IPL 2022 | क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर ! IPL च्या 15 व्या हंगामाबाबत BCCI चे सचिव जय शाहांकडून मोठी घोषणा

Pune Crime | पुणे पोलिसांकडून प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासरावला नोटीस, जाणून घ्या प्रकरण

Pune Ring Road | अखेर पुण्याच्या रिंगरोडची रुंदी कमी करण्यास राज्य सरकारची मान्यता

Related Posts