IMPIMP

Covid 19 Drugs | नव्या औषधानं फक्त 5 दिवसात कोरोना रुग्ण होणार ठणठणीत – सीडीआरआयचा दावा

by nagesh
Covid 19 Drugs | coronavirus drugs cdri achieves breakthrough trial umifenovir covid 19 treatment CDRI

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाCovid 19 Drugs | गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाचा (Coronavirus) हाहाकार सुरु आहे. अजूनही तो कमी आला नाही. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही लसींचा वापर करण्यात येत आहे. परंतू, त्यानंतर कोरोना होणार नाही असे म्हणता येत नाही. कारण लस घेऊन सुद्धा अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पण लस घेतल्यानंतर पुर्वी होणारा त्रास मात्र निश्चितच कमी झाला आहे. दरम्यान, कोरोना नियंत्रणात आणणारं देशातील पहिलं एँटिवायरल ड्रग उमिफेनोविरचा शोध (Covid 19 Drugs) केंद्रीय औषध संशोधन संस्थेच्या (CDRI) वैज्ञानिकांनी लावला आहे. आतापर्यंत १३२ रुग्णांवर तिसऱ्या टप्प्यात या औषधाचा यशस्वी प्रयोग करण्यात आल्याचा दावा सीडीआरआयने केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कोरोनाच्या विना लक्षण आणि सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर उमिफेनोविर प्रभावी ठरत आहे. सीडीआरआयच्या वैज्ञानिकानुसार कोरोनाच्या डेल्टा
प्लस व्हेरिएंट विरोधात एँटिवायरल ड्रग उमिफेनोविर चांगला प्रतिसाद देण्याची आशा आहे. कारण डेल्टा रुग्णांवरही हे औषध प्रभावी असल्याचे
निदर्शनास आले आहे. पाच दिवसांत व्हायरल लोड पूर्णत: नष्ट करण्यामध्ये उमिफेनोविर औषध महत्त्वपूर्ण ठरत असल्याचा दावाही वैज्ञानिकांनी केला आहे.

 

 

सीडीआरआयचे संचालक तपस कुंडू म्हणाले की, सीडीआरआच्या १६ सदस्यांच्या सांगण्यावरून कोरोना काळात उमिफेनोविरची चाचणी औषध म्हणून वापरण्यात आली होती. तीन टप्प्यात ही चाचणी पूर्ण झाली. या चाचणीमध्ये विना लक्षण आणि सौम्य लक्षण असणाऱ्या कोरोना रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. पाच दिवस दिवसातून दोनदा उमिफेनोविर ८०० एमजीचा डोस घेतल्यास रुग्णातील कोरोना व्हायरसचा परिणाम संपुष्टात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वेगाने कोरोना रुग्ण बरे होण्यास मदत झाली. ही चाचणी १८ ते ७५ वयोगटातील रुग्णांवर करण्यात आली होती. गोव्याच्या मेडिजेस्ट मैसर्सने औषध बनवण्याचं टेक्निक केले आहे. लवकरच उमिफेनोविर टॅबलेट आणि सिरपच्या रुपाने बाजारात आणली जाऊ शकते. या औषधाची किंमत रुग्णांना परवडेल असे आहे. एन्फ्लूएंजा व निमोनियासारख्या आजारात उमिफेनोविरचा औषध म्हणून वापर रशिया, चीनसह अन्य देशात गेल्या २० वर्षापासून सुरु आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

सीडीआयआरचे मुख्य वैज्ञानिक रविशंकर म्हणाले की, कोरोनाचे सेल नष्ट करण्याचे काम उमिफेनोविर करते. कोरोनाचा मानवी पेशींमध्ये होणारा शिरकाव राेखते. उमिफेनोविरच्या ५ दिवसांच्या औषधाचा खर्च ६०० रुपये इतका आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं क्लिनिकल चाचणीचं मूल्यांकन केले आणि आपत्कालीन परवानगीसाठी सौम्य लक्षण असणाऱ्या आणखी रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात सांगितले आहे. याशिवाय गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी ही कोरोना उपचारात उमिफेनोविर सुरक्षित आहे. देशात गेल्या २४ तासांत २७ हजार १७६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ वर पोहोचली.

 

Web Title : Covid 19 Drugs | coronavirus drugs cdri achieves breakthrough trial umifenovir covid 19 treatment CDRI

 

हे देखील वाचा :

SBI नं जिंकलं कोटयावधी ग्राहकांचं मन, कर्जाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Baramati Crime | दुर्देवी ! अंजनगावात शेततळ्यात बुडून माय-लेकींचा मृत्यू

UP Election | काँग्रेसचा नवा फॉर्म्युला ! तिकिट हवं असेल तर 11 हजार रुपये अन् ‘या’ 7 प्रश्नांची द्या उत्तरं

 

Related Posts