IMPIMP

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

by nagesh
gold price today fall in gold and silver price today on 25 august 2021 check latest gold rate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today । सोन्या-चांदीच्या दरात वारंवार किंमती (Gold Silver Price Today) बदलताना दिसतात. मागील आठ्वड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या किंमतीत किरकोळ वाढ झाल्याचे दिसले. मात्र आता देशान्तर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. MCX नुसार आजच्या सोन्याच्या भावात 0.16 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे सध्या सोन्याचा भाव 47,926 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तसेच, चांदीच्या दरात 0.3 टक्के घसरण झाली. आज चांदीची किंमत 67,865 रुपये आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

गेल्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमतीत (Gold Price) 400 रुपये अर्थात 0.75 टक्क्यांची घसरण झाली होती. आणि चांदीच्या भावात (Silver Price) 0.5 टक्के घसरण झाली होती. गतवर्षी 2020 मध्ये मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव (Gold Price) पन्नास हजाराच्या वर होता. मात्र त्या तुलनेत आज सोन्याचा भाव पन्नास हजाराच्या आत मध्ये आहे. त्यामुळे गतवर्षी तुलना करता सध्या सोने 8274 रुपयांनी स्वस्त आहे.

 

 

दरम्यान, Augmont (ऑगमाँट) कडून EMI वर सोने खरेदीचा पर्याय आहे. यासाठी प्रारंभी 20 टक्के डाउन पेमेंट करावं लागणार आहे. दरम्यान. 20 टक्के पेमेंटनंतर EMI फिक्स्ड होतो. यासाठी ग्राहकांना कुठलाही अतिरिक्त रक्कम भरावी लागत नाही.
तसेच, सोन्या-चांदीचा भाव फक्त मिस्ड कॉलद्वारे देऊन जाणून घेता येणार आहे.
8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये sms येणार आहे. तसेच, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App जारी केलं आहे.
यावरून ‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहक या माध्यमातून सोन्याची शुद्धता तपासू शकणार आहे.

 

 

Web Title : Gold Price Today | gold and silver price fall on today 2 august 2021 check latest gold rate

 

हे देखील वाचा :

Android Phone | सावधान ! 27 सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये Gmail, YouTube आणि Google सुद्धा नाही चालणार

GST Restrictions Relaxations | करदात्यांना दिलासा ! जुलैमध्ये 1.16 लाख कोटी जीएसटी संकलन; करदात्यांना सीएच्या प्रमाणपत्राची गरज नाही?

Shivsena | शिवसेनेची सामनातून भाजपवर टीका; ‘राज्यात भाजपचा ‘अंतकाळ’ जवळ आलाय’

 

Related Posts