IMPIMP

High Court | 15 वर्षांपुढील वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

by nagesh
High Court | important remark of allahabad hc said his character cannot be assessed by being active on dating sites

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  अलाहाबाद उच्च न्यायालयाचे (Allahabad High Court) न्यायमूर्ती मो. असलम (Justice Mo. Aslam) यांनी एका खटल्याच्या सुनावणीवेळी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आयपीसी कलम 375 (IPC Section 375) मधील दुरुस्तीनंतर 15 वर्षांपुढील वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणे बलात्काराच्या (Rape) श्रेणीत येत नसल्याचे म्हंटले आहे. दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने पत्नीवर अत्याचार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोपी असणाऱ्या मुरादाबादच्या खुशाबे अलीला (Khushabe Ali) अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) जामीनही मंजूर केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मुरादाबादच्या भोजपूर पोलीस स्टेशनमध्ये (Bhojpur police station) खुशाबे अलीच्या विरोधात
त्याच्या पत्नीने आठ सप्टेंबर 2020 मध्ये अत्याचार, मारहाण आणि धमकी देण्यासह
अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याची तक्रार दाखल केली होती.

 

पीडितेने मॅजिस्ट्रेट समोर साक्ष दिली होती. त्यावेळी तिने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचं
आणि खुशाबे अलीच्या भावांनी बलात्कार केले नसल्याचं म्हटलं होतं.
तसेच आयपीसीच्या कलम 375 मध्ये 2013 मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार 15 वर्षांच्या अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणे बलात्काराच्या श्रेणीमध्ये येत नाही.
असे खुशाबे अली यांचे अधिवक्ता केशरीनाथ त्रिपाठी (Advocate Keshrinath Tripathi) यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर सरकार पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला.

 

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, कलम 375 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.
नव्या संशोधनानुसार कलम दोनमध्ये म्हणण्यात आलंय की, पत्नी 15 वर्षांपेक्षा कमी वयाची नसेल तर शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही.
त्यामुळे न्यायालयाने खुशाबे अलीला अटींसह जामीन मंजूर केला.

 

 

Web Title : High Court | allahabad high court said having physical relation with wife above 15 years of age is not crime

 

हे देखील वाचा :

Spa Center In Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश

Governor Bhagat Singh Koshyari | ‘दुनिया में सबसे जादा ‘मीडिया’ से डर लगता है’

Pune lockdown | पुण्यात निर्बंध जोमात अन् व्यावसायिक कोमात

Modi Government | PM मोदींचा मोठा निर्णय ! ’राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलले; जाणून घ्या नवीन नाव

 

Related Posts