IMPIMP

Income Tax Return मध्ये कमाई लपवणार्‍यांचे स्कॅनिंग सुरू, यावेळी थोडी वेगळी आहे पद्धत

by nagesh
Budget 2023 | union budget finance minster can announce income tax exemption limit

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाIncome Tax Return | आर्थिक वर्ष 2021 – 22 संपणार आहे. प्राप्तीकराशी संबंधित कामाची अंतिम तारीखही जवळ आली आहे. त्याच वेळी, प्राप्तीकर विभागाने आपले उत्पन्न कमी सांगणार्‍या लोकांची ओळख पटवण्यासाठी एक पूर्णपणे नवीन पद्धत अवलंबली आहे. (Income Tax Return)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विभागाचे नवीन पोर्टल ’इनसाइट’ वरील डेटाच्या अल्गोरिदमिक स्कॅनिंग (Algorithmic Scanning) द्वारे प्राप्तीकर अधिकारी यावर्षी किंवा गेल्या काही वर्षांत प्राप्तीकरात गडबड केलेल्या लोकांची नावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

2021 – 22 मध्ये लागू होणार्‍या नवीन नियम लागू झाल्यानंतर आता मशीन जे नाव सांगेल,
प्राप्तीकर विभागाचे अधिकारी विहित नियमांच्या आधारे त्या व्यक्तीकडून पूर्वीच्या कोणत्याही कराच्या मूल्यांकनाचा तपशील मागू शकतात. (Income Tax Return)

 

एका प्राप्तीकर अधिकार्‍याने इनसाइट पोर्टलबद्दल सांगितले की, सध्या या पोर्टलमध्ये काही अनियमितता आहे,
त्यामुळे करचोरी चार वर्षांची असेल आणि पोर्टल फक्त एक वर्षाचीच दाखवू शकते.
परंतु यामुळे आम्हाला कारवाई करण्यास एक आधार मिळेल. तसेच या पोर्टलवर माहिती अपलोड करण्यासही बराच वेळ लागतो. (IT Return)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्राप्तीकर विभाग, ’इनसाइट’ कडून माहिती घेतल्यानंतर, करदात्याला प्राप्तीकर कलम 148 अ अंतर्गत नोटीस जारी करते.
ज्यामध्ये करदात्याला आठवड्याभरात उत्तर द्यायचे आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे की केवळ या पोर्टलचा वापर करून मुंबईच्या क्षेत्रिय प्राप्तीकर कार्यालयाने 50 हजारांहून जास्त लोकांना कलम 148 अ अंतर्गत पुनर्मूल्यांकनाच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

 

कुठून मिळेल प्राप्तीकर विभागाला माहिती :

प्राप्तीकर विभाग बँका, एसबीआय (SBI), ईडी (ED), परदेशी प्रशासन आणि इतर तृतीय पक्षांकडून मिळालेली माहिती ’इनसाइट’ पोर्टलवर अपलोड करेल आणि स्कॅनिंगनंतर नावांना कर नोटीस जारी केली जाईल.

जर एखाद्या करदात्याने आठवडाभरात नोटीसला उत्तर दिले नाही तर त्या करदात्याची केस पुन्हा उघडली जाईल.
पुढे, जर करदात्याने नोटीसला उत्तर दिले आणि विभाग त्यावर समाधानी नसेल तर, करदात्याला पुनर्मूल्यांकन नोटीस जारी केली जाऊ शकते.

 

किती जुन्या प्रकरणांवर होईल कारवाई :
नवीन नियमानुसार, प्राप्तीकर विभाग 50 लाखांपेक्षा जास्त कर आकारणीमध्ये गडबड असल्यास 11 वर्षांपर्यंतच्या प्रकरणांवर कारवाई करू शकते,
तर कर आकारणी 50 लाखांपेक्षा कमी असल्यास केवळ 4 वर्षे जुन्या प्रकरणांवर कारवाई केली जाऊ शकते.

 

Web Title :- Income Tax Return | income tax scanning of those hiding earnings in return know the details

 

हे देखील वाचा :

Debt funds मध्ये आजच करा गुंतवणूक, चांगल्या रिटर्नसह तुमचे पैसे राहतील सुरक्षित – जाणून घ्या सविस्तर

Sanjay Raut | ‘धुळवडीला लोक भांग पितात मात्र…’; ठाकरे सरकारचे 25 आमदार संपर्कात म्हणणाऱ्या दानवेंवर राऊतांची ‘गुगली’

Brown-Red Rice | वजन कमी करण्यासाठी लाल किंवा तपकिरी भात उपयुक्त

 

Related Posts