IMPIMP

Maharashtra Police | देशभरातील 1380 जणांना पदके जाहीर ! महाराष्ट्रातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; 25 जणांना शौर्य पदक

by nagesh
Maharashtra Police | independence day 2021 1380 police personnel to be felicitated with gallantry service medals, President's Medal to 3 police officers from Maharashtra; Medal of bravery to 25 people

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने 1380 पोलीस पदकांची (Gallantry Medals) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आयटीबीपीच्या (ITBP) 23 जवानांना स्वातंत्र्य दिनी (Independence Day) विरता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये 20 जवान हे गेल्या वर्षी चीनच्या सैनिकांना गलवान खोऱ्यात भिडले होते आणि वीरमरण पत्करले होते. 1380 पदकांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) 67 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 3 पोलिसांना (Maharashtra Police) राष्ट्रपती पदक (president’s police medal for gallantry) जाहीर झाले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महाराष्ट्रातील 67 पोलिसांपैकी 25 जणांना वीरतेसाठी पोलीस पदक (police medal for gallantry), 3 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि 39 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक (police medal for meritorious service) देण्यात येणार आहे. यामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख (Assistant Commissioner of Police, Crime Branch, Pune Police) यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे.

 

देशभारातील 1380 जणांना पदके दिली जाणार आहेत. यामध्ये विरतेसाठी राष्ट्रपतींचे 2 पोलीस पदक,
वीरतेसाठी 628 पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी 88 राष्ट्रपती पोलीस पदक
आणि उत्कृष्ट सेवेसाठी 662 पोलीस पदक देण्यात येणार आहेत.
वीरतेसाठी 628 पोलीस पदकापैकी जम्मू-काश्मीर 256, सीआरपीएफला 151, आयटीबीपीला 23 वीरता पुरस्कार दिले जाणार आहेत.
याशिवाय ओडिशा पोलीस 67, महाराष्ट्र पोलीस 25 आणि छत्तीसगड पोलिसांना 20 पुरस्कार दिले जाणार आहेत.

 

Web Title :-  Maharashtra Police | independence day 2021 1380 police personnel to be felicitated with gallantry service medals, President’s Medal to 3 police officers from Maharashtra; Medal of bravery to 25 people

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | सिगारेट आणायला उशीर झाल्याने मित्रावर सपासप वार करून खून

Delta Plus Variant | पुणे शहरात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा पहिला रूग्ण

Pune Crime | ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून 7.76 कोटींची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

Zika Virus | पुण्यात झिका संसर्गाचा धोका; 4 महिने गर्भधारणा टाळण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला

 

Related Posts