IMPIMP

PM Modi | ‘या’ 6 सरकारी योजनांवर PM मोदींची ‘नजर’, 2024 च्या अगोदर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे ‘लक्ष्य’

by nagesh
PM Modi | six schemes which pm modi wants to reach all and need for a quantum jump in the run up to 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Modi | स्वातंत्र्य दिनानमित्त (Independence Day 2021) लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी 6 सरकारी योजनांचा उल्लेख केला. 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनांचा लाभ सर्व लोकांना मिळावा असा त्यांचा मानस आहे. या योजना प्रत्येक माणसापर्यंत पोहचाव्यात हे सरकारचे लक्ष्य आहे. या योजना कोणत्या आहेत आणि सध्या त्यांची काय स्थित आहे ते जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

1. आयुष्मान भारत (ayushman bharat yojana) – खुप काही करणे बाकी आहे

आयुष्मान भारत अंतर्गत जवळपास 50 कोटी लोकांना 5 लाख रुपयांचे मोफत वैद्यकीय विमा संरक्षण मिळते. या योजनेचे कोणतेही लक्ष्य ठरवलेले नाही. आतापर्यंत 10 कोटी लोकांना या योजनेंतर्गत कार्ड मिळाले आहे. म्हणजे जवळपास 40 कोटी लाभर्थ्यांना कार्ड मिळणे बाकी आहे. विविध राज्यांनी आणखी 15 कोटी लोकांना संरक्षण देण्यासाठी योजनेचा विस्तार केला आहे, आतापर्यंत अशा 6 कोटी लोकांना कार्ड दिले आहे.

 

– बिहार-UP लक्ष्यापासून खुप मागे

 

सर्वात मोठी दोन राज्य उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सुमारे 10-10 कोटी लोकांना कार्ड मिळणार आहे. परंतु आतापर्यंत येथे अनुक्रमे 1.4 कोटी आणि 70 लाख कार्ड वाटली आहेत. तर छोट्या राज्यांनी चांगले काम केले आहे.

 

 

2. उज्ज्वला योजनाचा (ujjwala scheme) बर्‍यापैकी लाभ (PMUY)

उज्ज्वला मोफत एलपीजी कनेक्शन योजना 2019 मध्ये त्या 8 कोटी लाभार्थ्यांसाठी वेळेपूर्वी पूर्ण झाली ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नव्हते. 2019 च्या निवडणुकीत मोदींसाठी ही योजना गेम चेंजर ठरली असा दावा केला जात आहे. आता योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

 

 

3. दोन जीवन विमा योजना, आणखी कामाची आवश्यकता (pm suraksha bima yojana – PMSBY)

 मोदींच्या पहिल्या कार्यकाळात सुरू केलेल्या दोन जीवन विमा योजनांमध्ये किरकोळ प्रगती झाली

आहे. यामध्ये आणखी कामाची आवश्यकता आहे. पीएम सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय)
मध्ये 18-70 वर्यागटातील 23.6 कोटी लाभार्थी आहेत. पीएम जीवन ज्योती विमा योजना
(पीएमजेजेबीवाय) चे 18-50 वयोगटातील केवळ 10.5 कोटी लाभार्थी आहेत. देशात 18-50
वयोगटातील जवळपास 55 कोटी लोक आणि 18-70 वर्ष वयोगटाचे 65 कोटी लोक आहेत.

 

 

4. अटल पेन्शन योजना – मोठी योजना पण प्रतिसाद कमी (atal pension yojana)

केवळ 3.13 कोटी लोकांनी पीएम मोदींच्या पहिल्या कार्यकाळात सुरूकेलेल्या अटल पेन्शन योजनेत आपले नाव नोंदवले आहे. योजना 18-40 वर्ष वयोगटासाठी असून या वयोगटाचे देशात 45 कोटी लोक आहेत. या योजनेत अपेक्षीत प्रतिसाद मिळालेला नाही.

 

 

5. प्रधानमंत्री आवास योजना – 2022 चे लक्ष्य (pradhan mantri awas yojana)

या योजनेत 2022 च्या अखेरपर्यंत प्रत्येक बेघर व्यक्तीला घर देण्याचे लक्ष्य आहे. ही योजना खुप चांगले
काम करत आहे. सरकारचे लक्ष्य मार्च 2022 पर्यंत 2.01 कोटी घरे आणि उर्वरित लक्ष्य (65 लाख घरे) 2022 च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आहे. महाराष्ट्र आणि तमिळनाडुसारख्या राज्यात योजनेला आवश्यक प्रतिसाद नाही, येथे आतापर्यंत एकुण 50% आणि 40% पेक्षा कमी लक्ष्य पूर्ण झाले आहे.

 

 

6. हर घर जल – 2024 साठी गेम-चेंजर?

2019 मध्ये स्वातंत्र्य दिनी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनेची घोषणा
करण्यात आली होती. भाजपासाठी 2024 मध्ये ही योजना गेम-चेंजर ठरू शकते, असा दावा केला
जात आहे. आतापर्यंत 2.6 कोटी कुटुंबांपैकी लाख कुटुंबांना कव्हर केले आहे. पश्चिम बंगाल,
झारखंड आणि छत्तीसगढमध्ये 15% पेक्षा कमी कव्हरेज आहे. राजस्थानमध्ये 20% आहे.

 

Web Title : PM Modi | six schemes which pm modi wants to reach all and need for a quantum jump in the run up to 2024

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बायकोला शिवीगाळ करणे ज्येष्ठाला पडले महागात; शेजार्‍यानं 2 दात पाडले, जाणून घ्या प्रकरण

MoRTH | केंद्र सरकारने बदलले बाईक चालवण्याचे नियम, जाणून घ्या आता मोटरसायलवर मागे कसे बसायचे

Bullock Cart Race Nagar | अहमदनगरच्या मलकापूरला बैलगाडा शर्यत आयोजित करणार्‍या जुन्नरमधील 6 जणांना अटक

 

Related Posts