IMPIMP

Pune Crime | बायकोला शिवीगाळ करणे ज्येष्ठाला पडले महागात; शेजार्‍यानं 2 दात पाडले, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime | 22 years old boy wears undergarments of house owner woman and makes photo session, makes obscene gestures by speaking in dirty voice, molestation case registered in wanwadi police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | शेतात काम करीत असताना बायकोला शिवीगाळ करणे, ज्येष्ठ शेतकर्‍याला चांगलेच महागात पडले. आपल्यालाच शिवीगाळ करतो, असे वाटून शेजारच्या शेतातील लोकांनी केलेल्या मारहाणीत त्यांना आपले दोन दात गमावण्याची पाळी आली. हा प्रकार जुन्नर (Junnar) तालुक्यातील नेतवड कुटेमळा येथे 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास (Pune Crime) घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी ओतूर पोलिसांनी (otur police station) जयश्री बाळु गायकवाड, बाळु बबन गायकवाड आणि किशोर बबन गायकवाड या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रामदास नथू गायकवाड (वय ६५, रा. नेतवड, कुटेमळा, ता़ जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामदास गायकवाड यांनी शेतात काम करीत असताना आपल्या बायकोला शिवीगाळ करीत होते. जवळच्या शेतात काम करीत असलेल्या आरोपी यांना फिर्यादी हे आपल्यालाच शिवीगाळ करीत असल्याचा गैरसमज झाला. आरोपी यांनी पळत येऊन फिर्यादी यांना खाली पाडुन त्यांच्या छातीवर बसले. त्यांच्या तोंडावर जोरात बुक्की मारुन त्यांच्या तोंडातील दोन दात पाडले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांची पत्नी सोडविण्यासाठी आली असताना तिलाही धक्काबुक्की केली. ओतूर पोलिस स्टेशनमधील (otur police station) पोलीस निरीक्षक कांबळे (Police Inspector Kamble) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Swearing at wife cost the eldest dearly; Neighbor knocked out 2 teeth, find out the case of otur police station

 

हे देखील वाचा :

MoRTH | केंद्र सरकारने बदलले बाईक चालवण्याचे नियम, जाणून घ्या आता मोटरसायलवर मागे कसे बसायचे

Bullock Cart Race Nagar | अहमदनगरच्या मलकापूरला बैलगाडा शर्यत आयोजित करणार्‍या जुन्नरमधील 6 जणांना अटक

Pune Crime | चोरीच्या संशयाने मारहाण करुन तरुणाचा खुन, मंचर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Pune Crime | मुली झाल्याने वंशाच्या दिव्यासाठी केला दुसरा विवाह; हडपसरमध्ये पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल

 

Related Posts