IMPIMP

Ahmednagar Crime | दुदैवी ! ‘शोष’ खड्ड्यात पडून साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यु; नाशिक -पुणे महामार्गावरील घटना

by nagesh
Pune Crime | Incidents in Kondhwa An acquaintance on Instagram called the woman for a night visit and her husband beat her

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Ahmednagar Crime | हॉटेलमधील सांडपाणी मुरविण्यासाठी घेतलेल्या शोषखड्ड्यात पडून एका साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुदैवी मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Ahmednagar Crime)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दानवी ऊर्फ परी दर्शन मंचरे (वय साडेपाच वर्षे, रा. गणेशनगर, अकोले बायपास रोड, संगमनेर) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना संगमनेर (sangamner) तालुक्यातील नाशिक -पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) माहुली येथील हॉटेल निलायम समोर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. (Ahmednagar Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहुली येथील हॉटेल निलायमने सांडपाणी मुरविण्यासाठी पुढील बाजुला शोषखड्डा घेतला आहे.
या खड्ड्यालगत त्यांनी सुशोभिकरणासाठी कारंजे बसविले आहे.
दर्शन मंचरे व त्यांची मुलगी परी मंचरे हे रवींद्र लेंडे (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) यांच्याकडे कामानिमित्त आले होते.
ते घरी परत जात असताना हॉटेल निलायम येथे थांबले होते. परी कारंजाकडे खेळत होती. त्याचवेळी हॉटेल बाहेर एका बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे एकच गोंधळ सुरु झाला होता. मंचरे व लेंडे यांचे लक्ष आग लागलेल्या बसकडे असतानाच कारंजालगत असलेल्या शोष खड्ड्यात परी पडली. परीचा आवाज ऐकून तिच्या वडिलांनी तिकडे धाव घेतली. त्यांचा आरडाओरडा ऐकून नागरीक जमा झाले. त्यांनी खड्ड्यातून परीला बाहेर काढले. जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे घोषित केले. घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Ahmednagar Crime | Unlucky Five and a half year old Chimukli dies after falling into ‘suction’ pit; Incident on Nashik-Pune highway

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या युगलाला मारहाण करुन लुबाडले

Modi Government | मोदी सरकारने 23 कोटी लोकांच्या खात्यात पाठवले पैसे, तुमच्या खात्यात आले नाहीत का? तात्काळ ‘इथं’ करा तक्रार

‘या’ Multibagger Penny Stock मध्ये 3 वर्षात 1 लाख रुपयांच्या बदल्यात मिळाले 91 लाख रुपये, 2 रुपयांच्या शेयरचा भाव झाला 196 रुपये

 

Related Posts