IMPIMP

चंद्रपूर : पोलिस ठाण्यात झालेल्या मारहाणीनंतर मुलगा झाला बेपत्ता; शोधकार्य सुरु

by sikandershaikh
police-marhan

जिवती (चंद्रपूर) (chandrapur news)  : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) chandrapur news | एका प्रकरणातील चौकशीसाठी पोलिसांनी जिवती येथील बाबू मुन्ना पवार यांना पकडून नेले होते. पोलिसांनी वडिलांना चौकशीसाठी नेल्याचे त्यांचा मुलगा प्रताप बाबू पवार (19) याला समजले. त्यानंतर वडिलांची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या प्रताप पवार याला पोलिस हवालदाराने अपमानास्पद वागणूक देत मारहाण केली. या मारहाणीनंतर प्रताप बेपत्ता झाला आहे.

बाबू पवार यांना बुधवारी सायंकाळी सहा वाजता जिवती पोलिसांनी पकडून नेले होते. प्रताप पवार जेव्हा पोलिस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याला मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. पोलिस ठाण्यात त्याला एका पोलिसाकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर त्याने ‘मी घर सोडून जात आहे’, असे एका वहीवर लिहिले. तसेच त्याने त्याचा मोबाईल फोनही घरी ठेवला आणि बाहेर पडला.

याबाबत जिवती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांनी सांगितले, की ‘प्रताप पवार याच्या आई-वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. सध्या मुलाचा शोध घेतला जात असून, तो परतल्यावर याप्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तसेच जर मुलावर अन्याय झाला असेल तर संबंधितांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल’

Gold-Silver Rate Today : ‘सोन्या-चांदी’च्या दरात घसरण ! जाणून घ्या आजचे दर

Related Posts