IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | ACB ची नाशिकमध्ये मोठी कारवाई ! 28 लाख रुपये लाच घेणाऱ्या आदिवासी विभागाच्या बड्या अधिकाऱ्याला अटक

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाइन नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खूप मोठी कारवाई केली आहे. नाशिक एसीबीच्या पथकाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) आज तब्बल 28 लाख रुपये लाच घेताना आदिवासी विभागाच्या (Tribal Division) एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल (Executive Engineer Dinesh Kumar Bagul) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) लाच घेताना अटक (Accepting Bribe) केली. बागुल यांनी सेंट्रल किचन बिल (Central Kitchen Bill) मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

 

या कारवाईत नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील (Tribal Development Department) बांधकाम विभागाचे अभियंता दिनेशकुमार बागुल यांना 28 लाख रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं. दीड कोटी रुपयांचे बील मंजूर करण्यासाठी बागूल यांनी ठेकेदाराकडे (Contractor) रकमेच्या 12 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. ठेकेदाराने नाशिक एसीबीकडे बागुल यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना बेड्या ठोकल्या. पथकाने 28 लाखांची लाचेची रक्कम जप्त केली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दिनेशकुमार बागुल या अधिकाऱ्याकडे नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा संशय एसीबीच्या अधिकाऱ्यांना आहे.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवस सापळा रचून ही कारवाई केली. गेल्या दोन दिवसात एसीबीने अनेक कारवाया केल्या आहेत.
मात्र, आजची ही कारवाई सर्वात मोठी आहे. नाशिकच्या आदिवासी विभागात कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या फाईल पडून असतात.
नाशिकचे आदिवासी विकास भवन हे केवळ नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी नसून संपूर्ण राज्याचं आहे.
येथून राज्यातील आदिवासी विकास विभागाचे कामकाज चालवले जाते.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Nashik | Nashik acb arrest forrest officer executive engineer dinesh kumar baguldemanding 28 lakh bribe

 

हे देखील वाचा :

Mumbai-Pune Expressway | उद्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ वेळेत ट्रॅफिक ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव यंदा ‘अध्यक्षाविनाच’; अध्यक्षपदासाठीच्या ‘स्पर्धेमुळे’ निवड लांबली

CM Eknath Shinde | ‘पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते ?’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Related Posts