IMPIMP

Cyber Crime In Maharashtra | काय सांगता ! होय, थेट पोलीस आयुक्तांचे Fake अकाउंट काढून पैशांची केली मागणी

by nagesh
Cyber Crime In Maharashtra | cyber theif made fake account of commissioner of police nagpur amiteshkumar and demand money

नागपूर (Nagpur): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Cyber Crime In Maharashtra | नागपूर (Nagpur) शहरात गेल्या काही दिवसापासून क्राईम वाढताना दिसत आहे. या ठिकाणी अनेक गंभीर गुन्ह्याचे सत्र समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात सायबर गुन्हेगाराने (Cyber Crime In Maharashtra) नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या (Commissioner of Police) नावानं फेसबूक अकाउंट (Fake Facebook Account) काढून एका राष्ट्रवादीच्या नेत्याची फसवणुक (Fraud) करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत संबंधित राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी सायबर सेलला (Cyber cell) चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कोरोनाच्या काळात सायबर गुन्हेगारांचे (Cyber Crime) प्रमाण प्रचंड वाढले आहे.
या काळात अनेकांना गंडा घालण्यात आला. याबाबात अनेक वेगवेगळ्या केसेस पोलीस ठाण्यात दाखल देखील झाले आहे.
मात्र आता एक अनोखाच प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अज्ञातांनी थेट नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट तयार केलं होतं.
त्यानंतर आरोपीनं पोलीस आयुक्तांच्या (Commissioner of Police ) फेक अकाऊंटवरून राष्ट्रवादीचे (NCP) शहर उपाध्यक्ष रुपेश पन्नासे यांच्याकडे पैशाची मागणी केलीय.
तसेच, आरोपीने फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून पैशाची मागणी केल्यानं रुपेश पन्नासे (Rupesh Pannase) यांना संशय आला.
यांनतर त्यांनी तात्काळ यांनी थेट पोलीस आयुक्तांना (Commissioner of Police Amitesh Kumar) फोन करून यावरून विचारणा केली.
विचारणावेळी आपण असे कोणते पैसे मागितलं नसल्याचं पोलीस आयुक्तांनी पन्नासे यांना सांगितलं.

 

दरम्यान, यानंतर अज्ञात याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट (Fake Facebook account) तयार करून पैशांची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.
यांनतर पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
तसेच, बनावट अकाउंट ब्लॉक देखील केले आहे. या घटनेवरून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अशा प्रकरणावरून लोकांना सावधगिरीच्या सूचना देखील सायबर सेलकडून देण्यात आला आहे.

 

Web Title :- Cyber Crime In Maharashtra | cyber theif made fake account of commissioner of police nagpur amiteshkumar and demand money

 

हे देखील वाचा :

Pimpri Crime | वेडा म्हटल्याचा विचारला जाब, टोळक्याने बेदम मारहाण करत केला खून; पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ

Digital Transactions | प्रत्येक ठिकाणी कॅश करणार्‍यांनी व्हावे सावधान, अशाप्रकारचे 10 ट्रांजक्शन केल्यास येईल Income Tax ची नोटीस

Pune Corporation | पंचवटी ते कोथरूड बोगद्याच्या कामासाठी पुणे महापालिकेची चाचपणी सुरू

 

Related Posts