IMPIMP

Digital Transactions | प्रत्येक ठिकाणी कॅश करणार्‍यांनी व्हावे सावधान, अशाप्रकारचे 10 ट्रांजक्शन केल्यास येईल Income Tax ची नोटीस

by nagesh
Bank Interest Rate | in these four government banks offering highest interest on savings account see how much is earned

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Digital Transactions | मोदी सरकारने डिजिटल ट्रांजक्शनला (Digital Transactions) प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. तरीही काही लोक प्रत्येक छोट्या-मोठ्या कामात कॅशचा वापर करत आहेत. मोदी सरकारने (Modi Government) एटीएममधून (ATM) कॅश काढण्याचे नियम सुद्धा सक्त केले आहेत. यासाठी कॅशने व्यवहार करणार्‍यांनी आता सावध व्हावे. आम्ही या आर्टिकलबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये कॅश ट्रांजक्शनवर इन्कम टॅक्स (Income Tax) विभागावर नजर आहे. जर चूक झाली तर टॅक्स विभाग नोटीस जारी करू शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एका आर्थिक वर्षात सेव्हिंग आकऊंटसमधून 10 लाख कॅश काढली (saving account) असेल किंवा जमा केली आहे तर बँक ही माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला शेयर करते. यामध्ये डिजिटल व्यवहारांचा समावेश नाही. करंट अकाऊंटसाठी हे कॅश लिमिट 50 लाख रुपये आहे.

 

एका आर्थिक वर्षात फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 10 लाखापेक्षा जास्त जमा केल्यास (fixed deposit) याची माहिती इन्कम टॅक्स विभागाशी शेयर केली जाते. यामध्ये कॅश ट्रांजक्शन शिवाय डिजिटल ट्रांजक्शन आणि चेकबुकच्या माध्यमातून ट्रांजक्शनचा सुद्धा समावेश आहे. ज्या बँकेच्या एफडी अकाऊंटमध्ये या लिमिटपेक्षा जास्त डिपॉझिट असेल, त्यास आणि जमा करणार्‍यास इन्कम टॅक्सकडून नोटीस येऊ शकते.

 

जर तुम्ही क्रेडिट कार्डचा (credit card) वापर केला तर कॅश जमा करणे टाळा. एका आर्थिक वर्षात जर क्रेडिट बिलच्या रूपात 1 लाखापेक्षा जास्त कॅश जमा केली तर याची माहिती टॅक्स डिपार्टमेंटला दिली जाते. जर क्रेडिट कार्डचे बिल एका आर्थिक वर्षात 10 लाखापेक्षा जास्त झाले तरी सुद्धा टॅक्स विभाग नोटीस जारी करू शकते. यामध्ये डिजिटल ट्रांजक्शनसह कॅश ट्रांजक्शनचा सुद्धा समावेश होतो.

 

जर एका आर्थिक वर्षात 10 लाखाचा डिमांड ड्रॉफ्ट (Demand Draft) कॅशमध्ये बनवला गेला तर बँकेला पॅन कार्डची माहिती शेयर करावी लागेल. कारण यास ट्रॅक केले जाऊ शकते.

 

याशिवाय एका आर्थिक वर्षात शेयरमध्ये 10 लाखापेक्षा जास्त गुंतवणुक (share bazar) केल्यास कंपनी याची माहिती टॅक्स विभागाला देते.
यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारची गुंतवणूकीचा (online and offline investment) समावेश होतो.
अशाप्रकारे म्युचुअल फंडात 10 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक (Investment in mutual funds) केली तरी सुद्धा हे ट्रांजक्शन ट्रॅक केले जाऊ शकते.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

जर कुणी इंडिव्हिज्युअल एका आर्थिक वर्षात परदेशी टूरवर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला
तर इन्कम टॅक्स विभागाचे (Income Tax Department) लक्ष अशा ट्रांजक्शनवर असते.

 

रियल इस्टेटमध्ये 30 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक (Investment in real estate) केल्यास रजिस्ट्रार याची माहिती टॅक्स विभागाला देतात.
यामध्ये कॅश आणि डिजिटल दोन्ही प्रकारचे ट्रांजक्शनचा समावेश असतो.

 

जर एखादी सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट खरेदी केले तर 2 लाखापेक्षा जास्त कॅशमध्ये व्यवहार करता येऊ शकत नाही.
जर 2 लाखापेक्षा जास्त ज्वेलरी खरेदी केली असेल तर ज्वेलर्सला याची माहिती टॅक्स विभागाला द्यावी लागते.
अशाप्रकारे खरेदी केल्यानंतर 2 लाखापेक्षा जास्त कॅशमध्ये दिल्यास कार डिलरला याची माहिती टॅक्स विभागाला द्यावी लागते.

 

जेव्हा एखाद्या इन्डीव्हिज्युअलबाबत टॅक्स विभागाला अशी माहिती मिळते तेव्हा ते व्यक्तीच्या रिटर्नची तपासणी करतात.
जर रिटर्न फायलिंग (income tax return) आणि या खर्चात असामनता असेल तर टॅक्स विभाग नोटीस जारी करते.

 

 

Web Title :- Digital Transactions | 10 high value cash transactions tracked by income tax may get notice mutual funds

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पंचवटी ते कोथरूड बोगद्याच्या कामासाठी पुणे महापालिकेची चाचपणी सुरू

MP Sanjay Jadhav | शिवसेना खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू’

Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; बीडमध्येही आढळला रुग्ण

 

Related Posts