IMPIMP

Mumbai Crime | मुंबईतील धक्कादायक घटना ! शेजारी झोपू न दिल्याने पतीने केला पत्नीचा निर्घृण खून

by nagesh
Jalna Crime News | 18 year old boy stabs 8 year old brother to death in jalna

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Mumbai Crime | मालाडमध्ये (Malad) अत्यंत गजबजलेल्या मालवणी परिसरात एकाच दिवशी दोन खूनाच्या (Murder) घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत पतीने पत्नीची (Wife) तर दुसऱ्या घटनेत रागाने पाहतो म्हणून अल्पवयीन मुलाने तरुणाचा खून केला. या दोन्ही गुन्ह्यांत मालवणी पोलिसांनी (Malvani Police) आरोपींना अटक (Mumbai Crime) केली आहे.

 

मालवणी येथील यशोदीप सोसायटीमध्ये विजयमाला ज्ञानोबा बलाडे Vijaymala Gyanoba Balade (वय – 45) या पती व इतर सदस्यांसोबत वास्तव्यास होत्या. शुक्रवारी मध्यरात्री विजयमाला आणि ज्ञानोबा यांच्यामध्ये झोपण्यावरुन वाद झाला. रागाच्या भरात ज्ञानोबा यांनी घरात असलेला दगडी पाटा विजयमाला हिच्या डोक्यात घालून खून केला. घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी ज्ञानोबा याला ताब्यात (Arrest) घेतले. (Mumbai Crime)

 

दुसरी घटना अंबोजवाडी परिसरात घडली.
तौसिफ खान (Tausif Khan) हा तरुण शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातून सार्वजनिक शौचालयाच्या दिशेने जात होता.
त्यावेळी समोरुन एक अल्पवयीन मुलगा आला. एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे असलेल्या चाकूने तौसिफला भोसकले. जखमी झालेल्या तौसिफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. पोलिसांनी तौसिफ याचा खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Mumbai Crime | murder news malvani in malad mumbai crime

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts