IMPIMP

Nashik Anti Corruption | ‘आयपीएल’ बेटिंगचा धंदा सुरळीत ठेवण्यासाठी 3 लाखाची लाच घेणार्‍या पोलिस अधिकार्‍यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Nashik Anti Corruption | आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग (IPL Cricket Match Betting) घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच यापुढे बेटिंगचा धंदा सुरळीत चालु ठेवण्यासाठी 4 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून 3 लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik Anti Corruption) एका पोलिस उपनिरीक्षकासह दोघांवर कारवाई केली आहे. 3 लाख रूपयांची लाच घेताना पोलिस अधिकार्‍यावर कारवाई झाल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पोलिस उपनिरीक्षक महेश वामनराव शिंदे PSI Mahesh Wamanrao Shinde (स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) आणि संजय आझाद खराटे Sanjay Azad Kharate यांच्यावर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik Anti Corruption) कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या देवळाली कॅम्प (deolali camp) येथील फ्लॅटवर आयपीएल क्रिकेट मॅचचे बेटिंग ( ipl match cricket betting) सुरू असल्याबाबत पोलिस उपनिरीक्षक महेश वामनराव शिंदे यांना माहिती मिळाली होती. फ्लॅटवर सुरू असलेल्या उद्योगाविरूध्द गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच आगामी काळात धंदा सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी तक्रारदाराकडे 4 लाखाची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिकच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली.

 

अ‍ॅन्टी करप्शन विभागातील वरिष्ठांनी तक्रारीची खातरजमा केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला.
त्यावेळी उपनिरीक्षक शिंदे यांच्या सांगण्यावरून तडजोडीअंती खासगी इसम संजय आझाद खराटे (रा. गंगानिवा, एम.जी. रोड, नाशिकरोड, नाशिक) यांनी 3 लाख रूपयाची लाच पंचासमक्ष घेतली.
त्यानंतर उपनिरीक्षक महेश शिंदे आणि संजय खराटे यांच्याविरूध्द कारवाई करण्यात आली.
एलसीबीच्या पोलिस उपनिरीक्षकावर 3 लाख रूपयाच्या लाचेच्या प्रकरणात कारवाई झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी आणखी कोणाचा समावेश आहे काय याबाबतचा सखोल तपास अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधिकारी करीत आहेत.

 

Web Title : Nashik Anti Corruption | PSI Mahesh Wamanrao Shinde and Sanjay Azad Kharate arrested while taking bribe of Rs 3 lakh to keep IPL betting business afloat

 

हे देखील वाचा :

Job Offer Fraud | एका SMS ने मूर्ख बनवले ! काही क्षणात गमावले 3 लाख रुपये; जाणून घ्या अन् व्हा सावध

Pune Mayor Muralidhar Mohol | राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच ‘सुई’चा पुरवठा बंद, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा ‘पलटवार’

Gold Price Today | चांदीत 1300 रुपयांपेक्षा मोठी ‘घसरण’, सोने 45 हजार रुपयांच्या ‘खाली’; जाणून घ्या आजचे नवीन दर

 

Related Posts